महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ नोव्हेंबर) : इंद्रायणी नदीच्या घाटावर एका व्यक्तीच्या डोक्यात हत्याराने मारहाण करून खून केला. देहूगाव येथे बुधवारी (दि. २२) पहाटे पाच वाजता ही घटना उघडकीस आली. देवीदास मारुती भराडे (४२, रा.शिवबा चौक, सुसगाव, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
विकास बंडू घुगे (२३, रा. महादेव नगर, सुसगाव, पुणे. मूळ रा. मंगरूळ बुद्रुक, परभणी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २१) रात्री अकरा ते बुधवारी पहाटे सव्वा पाचच्या कालावधीत अज्ञातांनी फिर्यादी विकास घुगे यांचे मामा देवीदास भराडे यांच्या डोक्यात मारहाण करून खून केला. हा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…