पिंपरी चिंचवड महानगरपालिका व रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या सहकार्याने … या ठिकाणी मिळणार ४५ वर्षांवरील दिव्यागांकरीता कोविड-१९ लस!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ एप्रिल) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग कक्ष व रोटरी क्लब ॲाफ पिंपरी यांच्या सहकार्याने शहरातील ४५ वर्षावरील दिव्यांगांसाठी स्वतंत्र कोवीड १९ लसीकरण केंद्र रोटरी क्लब सभागृह संभाजीनगर चिंचवड येथे बुधवार दि २८ एप्रिल पासून सुरू करण्यात येणार असून शहरातील सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे,पक्षनेते नामदेव ढाके व आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कोवीड १९ लसीकरण केंद्र शहरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत.दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून स्वतंत्रपणे लसीकरण केंद्र रोटरी क्लबच्या सहकार्याने सुरू करण्यात येत असून असा उपक्रम राबविणारी पिंपरी चिंचवड ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात एकूण २१४५ दिव्यांग ४५ वर्षावरील असून ते लसीकरणासाठी पात्र आहेत. नागरवस्ती विेभागाकडील दिव्यांग कक्ष विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी रोटरी क्लब पिंपरी चे अध्यक्ष मेहूल परमार यांचे समवेत नियोजन केले आहे.

सर्व दिव्यांगांना लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली आहे.लसीकरण केंद्रावरआकुर्डी रूग्णालयाच्या प्रमुख डॅा सुनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय पथक कार्यरत असणार आहे.
कोवीड लसीकरण हे सुरक्षित आहे.कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

10 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago