महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १२ ऑगस्ट २०२३) : शहराचा समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि एल्प्रो सिटी स्क्वेअरच्या संयुक्त विद्यमाने ‘पिंपरी चिंचवड हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिक आणि पर्यटकांना शहराच्या इतिहासाशी जोडण्याची एक अनोखी संधी याद्वारे उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी चिंचवड हेरिटेज वॉकमध्ये सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वास्तू तसेच गेल्या काही वर्षांमध्ये समाजाला दिशा देणार्या कथांचाही समावेश असणार आहे. या उपक्रमामुळे इतिहास प्रेमींना, संस्कृती प्रेमींना आणि जिज्ञासूंना पिंपरी चिंचवड शहरात भूतकाळात घडलेल्या घटनांचा आढावा घेता येणार आहे. या हेरिटेज वॉकमध्ये शहरातील ८ अशा ठिकाणांची निवड करण्यात आली आहे ज्यांचे शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशात मोलाचे योगदान आहे. या ठिकाणांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शकांचीही निवड करण्यात आली असून प्रत्येक ठिकाणाची सविस्तर माहिती सहभागींना देण्यात येणार आहे.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिका आणि एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड हेरिटेज वॉकचा शुभारंभ करताना आनंद होत आहे.
हा उपक्रम शहरातील नागरिकांना शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मुळांशी जोडण्याचा एक दुवा असून रहिवासी आणि अभ्यासकांना शहराच्या इतिहासातील समृद्ध वारसा अनुभवताना पाहण्यासाठी महापालिका उत्सुक आहे.
या पत्रकार परिषदेस उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, एलप्रो इंटरनॅशनल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दिपक कुमार आणि एल्प्रो सिटी स्क्वेअरचे निशांत कंसल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
हेरिटेज वॉकचा उद्घाटन समारंभ भारत देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून १५ मिनीटांनी चिंचवडगांव येथील एलप्रो मॉल येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमास स्थानिक प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांसह विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात पंचप्रण शपथ घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या तिसर्या रविवारी शहरातील विविध ठिकाणांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहिती देण्यासाठी हेरिटेज वॉकचे आयोजन केले जाणार आहे.
यावेळी चिंचवड येथील चापेकर वाडा, मंगलमूर्ती वाडा, मोरया गोसावी मंदिर, शिरगाव येथील प्रति शिर्डी, देहू येथील संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर, देहू गाथा मंदिर, आळंदी येथील श्री गजानन महाराज मंदिर, संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर अशी ठिकाणे निवडण्यात आलेली असून पुढील कार्यक्रमात इतर विविध स्थळांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सिंह यांनी दिली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…