Categories: Editor Choiceindia

Delhi : वाहनांवरील नंबर प्लेट बाबत महत्त्वाची बातमी … HSRP साठी असा करावा लागेल अर्ज

महाराष्ट्र 14 न्यूज : सरकारच्या आदेशानुसार 1 डिसेंबरपासून वाहनांवर हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आवश्यक करण्यात आली आहे. हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स आवश्यक झाल्यानंतर वाहन मालकांच्या समस्या वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना समस्या येत आहेत. तर काही ठिकाणी नंबर प्लेटसाठी मनमानी किंमती वसूल केल्या जात आहेत. आतापर्यंत वाहनावर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट नसल्यास, त्याला फिटनेस सर्टिफिकेट देण्यावर बंदी होती. परंतु 15 ऑक्टोबर रोजी परिवहन आयुक्तांनी एक आदेश जारी करत, विना HSRP वाल्या सर्व वाहनांना आरटीओमध्ये होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या कामांवरही बंदी घालण्यात आली.

सध्या परिवहन विभागाने जुन्या वाहनांवर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट आवश्यक असल्याचा आदेश मागे घेतला आहे.
काय आहे हाय सिक्योरिटी नंबर प्लेट? हाय सिक्योरिटी नंबर प्लेट (HSRP) एक होलोग्राम स्टीकर आहे, ज्यावर वाहनाचा इंजिन आणि चेसिस नंबर असतो. हाय सिक्योरिटी नंबर प्लेट वाहन सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता बनवण्यात आली आहे. हा नंबर प्रेशर मशिनने लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारची पीन असते, जी वाहनाला जोडलेली असते. ही पीन एकदा वाहन आणि प्लेटशी जोडली गेल्यास, दोन्ही बाजूने लॉक होते.

कसं कराल HSRP ऑनलाईन अर्ज –
हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोड स्टिकर लावण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्यासाठी दोन पोर्टल तयार करण्यात आले आहेत. यासाठी http://bookmyhsrp.com/index.aspx वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर सार्वजनिक किंवा खाजगी वाहनाशी जोडलेला एक पर्याय निवडावा लागेल. खाजगी व्हीकल टॅबवर क्लिक केल्यास पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक, CNG आणि CNGपेट्रोल यापैकी पर्याय निवडावा लागेल. पेट्रोल टाईप टॅबवर क्लिक केल्यानंतर वाहनांची कॅटेगरी खुली होईल. यात बाईक, कार, स्कूटर, ऑटो असे पर्याय असतील. यात काही माहिती भरावी लागेल.

तसंच, गाडीला रजिस्ट्रेशन प्लेट असेल आणि केवळ स्टिकर लावायचा असल्यास, http://www.bookmyhsrp.com या वेबसाईटवर जाऊन माहिती भरावी लागेल.

कोणत्या वाहनावर कोणत्या रंगाचा स्टीकर –
हलक्या निळ्या रंगाचा स्टिकर पेट्रोल आणि सीएनजी वाहनांसाठी तयार करण्यात आला आहे. डिझेल गाड्यांसाठी नारंगी रंगाचा स्टिकर लावणं अनिवार्य आहे. दूरवरूनच वाहनांची ओळख पटावी हा या मागचा हेतू असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर परिवहन विभागाने वाहनांना हाय सिक्योरिटी नंबर प्लेट आणि इंधनानुसार रंगीत स्टिकर लावणं अनिवार्य केलं आहे. सुरुवातीला अनेक प्रयत्नांनंतरही याचा सकारात्मक परिणाम न झाल्याने, परिवहन विभागाने याबाबत सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून वाहन चालक नियमांकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत. याला सुनिश्चित करण्यासाठी 15 डिसेंबरपासून अभियान चालवण्यात येत आहे. सुरुवातीला केवळ चार चाकी वाहनांवरच सक्ती असणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago