Pune : मराठा समाजाकरिता महत्त्वपूर्ण निर्णय … महाविकास आघाडी सरकारने केली ही घोषणा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२०जून) : पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला स्वायत्तता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ही घोषणा केली. गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह मान्यता दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ व सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांची पुण्यातील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी ‘सारथी’चे अजित निंबाळकर, उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी माहिती दिली. अजित पवार म्हणाले, सारथी संस्थेचे सबलीकरण व विविध उपक्रमांसाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे.

सारथीची आठ विभागीय कार्यालये व एक उपपेंद्र सुरू करण्यात येणार आहे. पहिले उपपेंद्र कोल्हापूर येथे पुढील महिन्यापासूनच सुरू करण्याचा प्रयत्न आहे. शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वाच्या शहरात वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या व्याज परतावा योजनेत प्राधान्य दिले जाईल. सारथी संस्थेने पुढील तीन वर्षांचा विभागनिहाय कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केल्या.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

5 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago