Ichalkaranji : जुगार अड्ड्यावर चक्क ‘ मिळून ७ जणी ‘ … पोलिसांनी टाकला छापा!

महाराष्ट्र 14 न्यूज : इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी आणि शनिवार दरम्यान मध्यरात्री मोठी कारवाई केली. इचलकरंजी नजीक जयसिंगपूर येथील संभाजीनगर परिसरात पोलिसांनी महिलांच्या जुगार अड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एकूण 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 7 महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे.

विशेष म्हणजे जुगार अड्यावर पत्ते खेळणाऱ्या सर्व महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. संबंधित महिलांवर खिसे कापणे, चोरी, यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सातही महिलांवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. सदरची कारवाई इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख विकास जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत जयसिंगपूर पोलिसांनी देखील सहभाग घेतला.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये मीना किरण काळे (वय 40 रा. संभाजीनगर), छाया जगनू लोंढे (वय 30, रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगली), हेमा धर्मेंद्र कसबेकर (वय 40 रा. टेंबलाई नाका झोपडपट्टी कोल्हापूर), सुरेखा राजू नरंदेकर (वय 40 रा. केर्ली सध्या टेंबलाई नाका झोपडपट्टी कोल्हापूर), वर्षा इकबाल लोंढे (वय 35 रा. कोरोची), ज्योती नामदेव पाटील (वय 70 रा. समडोळी मळा जयसिंगपूर), बेबी दौलत शेख (वय 45 रा. संभाजीनगर झोपडपट्टी), अर्जुन कल्लाप्पा वसगडे (वय 53 रा. मंगेश्‍वर कॉलनी उचगाव) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी कारवाई कशी केली?
संभाजीनगर येथे एका घरात तीनपानी पत्याचा जुगार चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखाला मिळाली. ही माहिती खरी की खोटी याची खातरजमा पोलिसांनी केली. त्यानंतर इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेने जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने जुगार अड्यावर छापा टाकला.
यावेळी सात महिला आणि एक पुरुष तीन पाणी पत्याचा जुगार पैशावर खेळताना रंगेहात पकडले गेले. पोलिसांनी तातडीने त्यांना अटक केली. त्यानंतर पुढील तपास आणि कारवाईसाठी आरोपींना जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.संबंधित महिलांची अधिक चौकशी केली असता या महिला सराईत पिक-पॉकेटींग आणि स्नँचींग चोरीमधील रेकॉर्ड वरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.
ही कारवाई कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक गड विभाग जयश्री गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी पथकाद्वारे करण्यात आली.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

22 hours ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

2 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

2 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

3 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

5 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

6 days ago