‘तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही ‘ … रोहित पवारांचं पडळकरांना उत्तर!

महाराष्ट्र 14 न्यूज : ‘ शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा ‘ असं म्हणत भाजपा आमदार यांनी रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं . तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फुकटचे सल्ले देऊ नका असंही पडळकर यांनी म्हटलं आहे . त्यानंतर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून याला प्रत्युत्तर दिलं आहे . “ पवारसाहेब हे आमचे नेते , मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे . मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात हे मी विचारणार नाही ” असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं आहे .

रोहित पवार यांनी काय उत्तर दिलंय ?

माझे मित्र गोपीचंद पडळकर जी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला . बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात . यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल . माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे . कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते . त्यामुळं इथं पंचवीस वर्षांचा बॅकलॉग आहे . मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही . तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय आणि कोरोना नसता तर मतदारसंघातील बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते . असो .

पंचवीस वर्षांपैकी पाच वर्षे याच मतदारसंघातील आमदार हे राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते , तरीही रस्त्यांची ही दुरवस्था आहे , याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता . पण आपण मोठे नेते आहात त्यामुळं त्यांना जाब विचारणार नाहीत .

आणखी एक मुद्दा म्हणजे कर्जत – जामखेड याच मतदारसंघाची निवड का केली , असा प्रश्न मला मिडियासह अनेकांनी विचारला आणि त्याचं उत्तर मी यापूर्वीही अनेक जाहीर कार्यक्रमांतही दिलंय … ते म्हणजे या मतदारसंघाची अशी दुरवस्था असल्यानं इथं काम करण्यासाठी खूप वाव आहे . हे मी आधीच सांगितलंय , त्यामुळं आपण मिरजगावमधील खराब रस्ता आज दाखवला , यात नवीन काहीच नाही आणि अशा खराब रस्त्यांना कंटाळूनच ते दुरुस्त करण्याची जबाबदारी या मतदारसंघातील लोकांनी विश्वासाने माझ्यावर टाकली आणि मी ती पूर्ण करणारच . मी हवेतून पाणी काढणारा किंवा वाघाच्या जबड्यात हात घालणारा नेता नाही तर जमिनीवर उतरुन काम करणारा , लोकांचा विकास करण्याची शपथ घेऊन ती पाळणारा कार्यकर्ता आहे . त्यामुळं माझ्या मतदारसंघाची चिंता आपण करू नका .

राहिला प्रश्न साहेबांच्या खांद्यावर बसण्याचा …. तर साहेब हे आमचे नेते , मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे . पण मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही , पण आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल . त्यासाठी आपण जरुर प्रयत्न करा.

.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

7 hours ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

1 day ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

2 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

2 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

5 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

5 days ago