Categories: Editor Choiceindia

Hydrabad: मायानगरी मुंबईत येण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याला विकण्याचा केला प्रयत्न …!

महाराष्ट्र 14 न्यूज : हैदराबाद येथील सुभानपूर परिसरात २२ वर्षीय झोया खान पतीसोबत झालेल्या भांडणानंतर एकटीच राहत होती. तिला मायानगरी मुंबईत येण्याची इच्छा होती. तसेच २ महिन्याची बाळाची एकटी काळजी घेताना तिला पैशासह अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. यावेळी तिने आपल्या बाळाला विकण्याचा निश्चय केला. शेख अदनाना असं या दोन महिन्याच्या बालकाचं नाव आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. झोयाने शेजारी राहणाऱ्या एस. के. मोहम्मद आणि तबस्सुम या दाम्पत्याला ४५ हजारांना बाळ विकण्याचं ठरवलं.

मायानगरी मुंबईत येण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याला विकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमधील हबीब नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी २२ वर्षीय महिलेला २ महिन्याचा बाळाला विकण्याचा प्रयत्न करत असताना अटक केली. तक्रार दाखल झाल्यानंतर २४ तासाच पोलिसांनी कारवाई केली. २ महिन्याच्या नवजात बाळाचा ताबा मिळवला आणि महिलेला बेड्या ठोकल्या.

महिलेच्या पतीला बालकाला विकण्याचा प्रयत्न होत असल्याची चुणचुण लागली होती. माहिती मिळाल्यानंतर पतीने हबीब नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी बाळाची आई तसेच बाळाला विकत घेणाऱ्या कुटुंबातील पाच जणांना अटक केली आहे. व्यवहारासाठी मध्यस्थी करणाऱ्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाळाला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात आलं आहे, अशी माहिती हबीब नगर पोलीस ठाण्याच्या पी. शिव चंद्रा यांनी ही माहिती दिली

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago