Mumbai : विरारच्या रुग्णालयात आगीत पतीचा मृत्यू … बातमी कळताच पत्नीचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

महाराष्ट्र 14 न्यूज : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत तब्बल 14 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत आपल्या पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच एका रुग्णाच्या पत्नीला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचाही मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय कुमार दोषी यांच्यावर विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णालयाला लागलेल्या आगीत कुमार यांचा होरपळून मृत्यू झाला. कुमार यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त कळताच त्यांच्या पत्नी चांदणी दोषी यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले.

कुमार दोषी आणि चांदणी दोषी हे दाम्पत्य वसईतील 100 फूट रोड परिसरात वास्तव्यास होते. कुमार यांच्यावर विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात उपचार सुरू होते तर चांदणी यांच्यावर विरारमधील जिवदानी रुग्णालयात उपचार सुरू होते. एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण दोषी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्रयांनी दु:ख व्यक्त केले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा योग्य तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

3 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

4 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

5 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago