Editor Choice

पती कोरोना पॉझिटिव्ह … मायलेकीवर सात दिवसांपासून पुण्यातील औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये राहण्याची आली वेळ!

महाराष्ट्र 14 न्यूज : महिलेचा पती कोरोना पॉझिटिव्ह आहे. लोणावळा येथे हे कुटुंब एका कारभाऱ्याकडे कामाला होते. तिथेच ते राहत होतं. पती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर कारभाऱ्यानं थोडे पैसे देऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये जा असं सांगितलं. महिलेनं कोरोनाबाधित पतीला सोबत घेऊन पुणं गाठलं पती महिलेनं अर्धा तास डॉक्टरांचे पाय धरले तेव्हा तिच्या पतीला दाखल करून घेतलं.

या मायलेकी फक्त दुपारचं जेवण 5 रुपयांत शिवभोजन थाळीच्या रुपात खातात. संध्याकाळी मात्र उपाशी झोपतात. शेजारील शिंदे नावाच्या ताईंनी 2/3 दिवस डबा दिला, पांघरून दिलं. आता पुढे अजून 8 दिवस काय करायचं असा मोठा प्रश्न या मायलेकीसमोर उभा आहे. कोरोनामुळे माणुसकी ओशाळली आहे. सामान्य नागरिकांचे खूप हाल होत आहे. तरी सरकारनं कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांकडेही लक्ष द्यायला हवं, अशी मागणी केली जात आहे.

औंध जिल्हा सामान्य रुग्णालयात आतापर्यंत कोरोनाच्या १०५५ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर ६९ रुग्ण उपचार घेत असून आज ३६ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. यात पुणेजिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 weeks ago