महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ जुलै) : महाराष्ट्रातील वीजदर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याने त्याचा उद्योग जगतावर परिणाम होत आहे. बेकायदेशीर वीजदर वाढ आणि सर्वच गैर प्रकाराची चौकशी करावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्य औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे.
न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी प्रतिवादी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, एमएसईबीच्या होल्डिंग कंपनीचे अध्यक्ष (ऊर्जामंत्री), वीज नियामक आयोगाचे सचिव, महावितरणचे संचालक (वाणिज्यिक) व महावितरणच्या अध्यक्षांसह व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजावून ७ ऑगस्ट पर्यंत शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
शेतकऱ्यांना (Farmers) न कळवताच अश्वशक्तिचा वापर अधिक दाखवून देयके अनेक विभागात काढली गेली. कृषीसाठी ३५ हजार ५६४ मिलियन युनिट (दशलक्ष) वापर केल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून १७ हजार मिलियन युनिटच्यावर विजेचा वापर होऊ शकत नाही. (Aurangabad) म्हणजे २० हजार मिलियन युनिटचा वापर अधिकचा दाखवला आहे. त्यामुळे वीजमीटरशी आधारकार्ड जोडावे, अशी विनंती ऊर्जा क्षेत्रातील अभ्यासक, अभियंता अजित देशपांडे यांनी ॲड. गिरीश नाईक-थिगळे यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेत केली आहे.
त्यात ४४ लाख कृषी पंपधारकांपैकी केवळ १७ टक्के शेतकऱ्यांकडेच मीटर असून महावितरणने मात्र, ६५ टक्के शेतकऱ्यांकडे मीटर असल्याचे नमूद केले आहे. तसेच २०२१-२२ मध्ये १ लाख १६ हजार ३२८ एवढी विजेची विक्री झाली तर १ लाख ४४ हजार २५३.३२ मिलियन युनिट विजेची खरेदी केली आहे. त्यातून २७ हजार ९२४.३३ मिलियन युनिटचा तोटा दाखवला आहे.
त्याचा अर्थ २४ टक्के तोटा असताना १४ टक्के दाखवला आहे. वीज दरवाढीच्या प्रस्तावाची बेकायदेशीर सूचना जारी केली असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. प्रतिवादींकडून सहायक सरकारी वकील पी. के. लखोटिया, ॲड. पी. पी. उत्तरवार व ॲड. ए. एस. बजाज यांनी काम पाहिले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…