Categories: Editor Choice

नवी सांगवीत अहिल्यादेवी सेवा संघातर्फे गुणवंतांचा सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० ऑक्टोबर) : ज्या घरात लेकी, सुना या आनंदित असतात असे कुटुंब आदर्शवत असते असे मत ग्रामीण कथाकार प्रा.रविंद्र कोकरे यांनी नवी सांगवी येथे व्यक्त केले. अहिल्यादेवी सेवा संघ,सांगवी यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२४ व्या पुण्यतिथीनिमित्ताने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व समाजबांधवांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी महापौर उषा ढोरे, माजी नगरसेवक शंकर जगताप, शशिकांत कदम,सागर आंघोळकर,अंबरनाथ कांबळे,महेश जगताप,हर्षल ढोरे,संतोष कांबळे, संतोष ढोरे, माजी नगरसेविका आशा शेंडगे,माधवी राजापुरे,शारदा सोनवणे बाळासाहेब देवकर , माऊली जगताप,राहुल जवळकर,संजय कणसे,मुकुंद कुचेकर,महावीर काळे,संजय नाईकवाडे,माजी अध्यक्ष अभिमन्यु गाडेकर, सुर्यकांत गोफणे,बाबासाहेब चितळकर, सखाराम रेडेकर ,संघाचे अध्यक्ष अजय दुधभाते यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नर्सरी ते बारावीपर्यंतच्या तसेच उच्च शिक्षण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रा.रविंद्र कोकरे म्हणाले की , विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडत्या क्षेत्रात करिअर करायला हवे. गुणवंत होण्याबरोबरच सर्वगुणसंपन्न माणूस म्हणून ओळख निर्माण करायला हवी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांची जोपासना होणे आवश्यक आहे.
माजी महापौर उषा ढोरे, भाजपा चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख शंकरशेठ जगताप म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य ,त्यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य अहिल्यादेवी संघाच्या माध्यमातून केले जात आहे.

विविध उपक्रमाच्या माध्यमातून संघाने केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. अहिल्यादेवी होळकर यांची केवळ जयंती पुण्यतिथी साजरी न करता, त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवत सतत समाजोपयोगी कामे करणारा हा संघ शहरातील एक आदर्शवत असा संघ बनला आहे.माजी नगरसेवक शशिकांत कदम म्हणाले ,सर्व समाज बांधवाना एकत्रित करून संघाच्या माध्यमातून एकजुटीचा संदेश दिला आहे. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. माजी महापौर माई ढोरे म्हणाल्या , संघाने गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे. अहिल्यादेवी सेवा संघाच्या कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

अजित चौगुले व मनोजकुमार मारकड यांनी सूत्रसंचालन केले. बिरु व्हनमाने यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

21 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago