Categories: Editor Choice

भारताने रचला इतिहास … शंभर कोटी नागरिकांचं झालं लसीकरण , PM मोदी म्हणाले, … आता लवकरच कोरोनाला पराभूत करू ‘

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ऑक्टोबर) : देशात कोरोनाच शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल देशातील नागरिकांचं अभिनंदन केले आहे. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी गुरुवारी सांगितले की, हे यश भारताचे आहे, भारतातील प्रत्येक नागरिकाचे आहे.

ते म्हणाले, ‘मी देशातील सर्व लस उत्पादक कंपन्या, लस वाहतुकीमध्ये गुंतलेले कामगार, आरोग्य क्षेत्रातील कर्माचारी या सर्वांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो. आज, 21 ऑक्टोबर 2021 चा हा दिवस इतिहासात नोंदविण्यात आला आहे. भारताने काही वेळापूर्वी शंभर कोटी डोसचा आकडा पार केला आहे. भारताने आज इतिहास रचला आहे. भारताने अवघ्या नऊ महिन्यांत ही कामगिरी केली आहे.

▶️’कोरोनाविरुद्ध एक मजबूत संरक्षणात्मक ढाल’
ते म्हणाले की, 100 वर्षातील सर्वात मोठ्या साथीचा सामना करण्यासाठी, देशाकडे आता 100 कोटी लसींच्या डोसची मजबूत संरक्षणात्मक ढाल आहे. आपल्या एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, ‘आपण 130 कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेचा, भारतीय उद्योग आणि विज्ञानाच्या विजयाचे साक्षीदार आहोत. 100 कोटी डोसचा आकडा पार केल्याबद्दल मी राष्ट्राचे अभिनंदन करतो. हे रेकॉर्ड बनवण्यात योगदान दिलेल्या डॉक्टर, नर्सेससह सर्व लोकांचे मी आभार मानतो.

▶️एम्सच्या झज्जर कॅम्पसचे उद्घाटन
यानंतर, एम्सच्या झज्जर कॅम्पसमध्ये विश्राम सदनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान म्हणाले की, इन्फोसिस फाउंडेशनने विश्राम सदनाची इमारत बांधली आहे, तर त्यासाठी जमीन आणि वीज आणि पाण्याची खर्च एम्स झज्जरने दिला आहे.

ते म्हणाले, ‘मी या सेवेसाठी एम्स व्यवस्थापन आणि सुधा मूर्ती जी यांच्या टीमचे आभार व्यक्त करतो.’ मोदी म्हणाले की, जेव्हा आयुष्मान भारत योजनेअंतर्गत रुग्णाला मोफत उपचार मिळतात, तेव्हा त्याची सेवा होत असते. या सेवेमुळेच आमच्या सरकारने कॅन्सरच्या सुमारे 400 औषधांची किंमती कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 hour ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

12 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

12 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago