Google Ad
Uncategorized

सात दिवसात त्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्या अन्यथा कर्मचाऱ्यांच्या घरच्या कुटुंबासहित रस्त्यावर उतरू -पिंपरी युवासेना

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दापोडी प्रभागामध्ये साफसफाईचा ठेका हा शुभम उद्योग यांना प्राप्त झालेला आहे. साफसफाई कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षापासून कोणत्याही कारण न देता कामावरून कमी केले जाते. ज्या कामगारांनी कोरोनाच्या काळात विशेष असे काम केले होते. त्या कर्मचाऱ्यांना आपल्या हिटलरशाही पद्धतीने कामावरून कमी केले आहे, असे पिंपरी चिंचवड युवा सेनेचे म्हणणे आहे.

पिंपरी युवा सेनेने याबाबत निवेदन दिले आहे, त्यात म्हटले आहे की, आम्ही आपणास विनीत करतो की, येत्या सात दिवसात त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा त्यांच्या ठिकाणी कामावर रुजू न केल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे इथे मोठे आंदोलन कामगारांच्या कुटुंबा सहित करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

Google Ad

असे निवेदन पिंपरी युवासेनेतर्फे अतिरिक्त आयुक्त मा. विजय खोराटे ह्यांना देण्यात आले. ह्यावेळेस पिंपरी युवा सेना अधिकारी श्री. निलेश हाके, रवी कांबळे, जयसिंग काटे, धर्मराज साळवे , महेंद्र पोळके उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!