Hinjwadi : शस्त्राच्या धाकाने लुटणारी टोळी पकडली … आरोपी सराईत गुन्हेगार

महाराष्ट्र 14 न्यूज : आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच वाढत चालले आहे. शस्त्राचा धाक दाखवून कारचालकाला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार २८ सप्टेंबरला रात्री पावणेनऊ वाजता हिंजवडी परिसरात घडला . या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका टोळीला अटक केली असून , त्यांच्याकडून दोन दुचाकी , एक पिस्तूल , एक जिवंत काडतूस , एक पिस्तूलसारखे दिसणारे लायटर जप्त करण्यात आले आहे .

अनिकेत मधुकर बोराडे ( वय १ ९ , रा . वराळे , तळेगाव दाभाडे ) , रॉकी उर्फ अनिल जयंत जाधव ( वय २० , रा . तळेगाव दाभाडे ) , विशाल मंजीनाथ वर्मा ( वय १ ९ , रा . काळोखेवाडी , तळेगाव दाभाडे ) , शरद ज्ञानेश्वर मोरे ( वय २२ , रा . रीहे , मोरेवाडी , ता . मुळशी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत . त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , योगेश गणेश शिंदे ( वय ३४ , रा .
कोंढवा खुर्द , पुणे ) हे त्यांच्या पत्नीची वाट पाहत हिंजवडी येथील ‘ टीसीएस ‘ कंपनीसमोर त्यांच्या कारमध्ये बसले होते .

त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला . याबाबत शिंदे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . आरोपींकडून पोलिसांनी दोन दुचाकी , एक पिस्तूल , एक जिवंत काडतूस , एक पिस्तुलासारखे दिसणारे लायटर असा एकूण एक लाख १५ हजार ५२५ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे . यातील दोन आरोपी सराईत गुन्हेगार आहेत . आरोपी मोरे याच्यावर एक खुनाचा गुन्हा आणि रॉकी जाधव याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल आहे . पुढील तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत .

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 weeks ago