या कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे अध्यक्ष शरद पाबळे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश आदक, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष राजू वारभुवन, डॉ. देविदास शेलार, बापुसाहेब गोरे, प्रकाश जमाले आपला आवाज चे मुख्य संपादक अतुल परदेशी संगीता तरडे, साम टीव्हीचे गोपाळ मोटघरे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय गायकवाड, मुकेश गायकवाड आदी उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषद ही देशातील सर्वात जुनी व सर्वात मोठी पत्रकार मातृसंस्था आहे. परिषदेचा वर्धापन दिन दरवर्षी आरोग्य दिन म्हणून 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो, मागील वर्षी एकाच दिवशी महाराष्ट्रातील 8 हजार पत्रकारांची तपासणी करण्यात आली होती तो एक आगळावेगळा रेकॉर्ड ठरला होता. यावर्षी तब्बल 10 हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, तसेच अध्यक्ष शरद पाबळे यांनी केला होता त्यानुसार सर्व तालुका, जिल्हा पत्रकार संघटनांनी आपापल्या भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरासाठी लोकमान्य कॅन्सर रिसर्च सेंटरचे अधिष्ठाता डॉ. निनाद नाईक, डॉ. क्षिरसागर, डॉ. सहदेव गोळे यांचे सर्व सहकारी तसेच नंदादीप सेरी आय हॉस्पिटल पिंपळे गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले. या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, डोळे तपासणी व विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचार यावेळी करण्यात आले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…