Categories: Maharashtra crimes

Panwel : ती लग्न करण्यासाठी दबाव आणतेय म्हणून त्याने तिला मारले …. परंतु कारण ऐकाल तर …….

महाराष्ट्र 14 न्यूज : ज्याने तिला कधी ही सोडून न जाण्याच्या शपथा दिल्या. या मुलीने ज्याच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिली. पुढील सात वर्षे सोबत राहाण्याचे स्वप्न दाखवले. त्याच प्रियकराने या प्रेयसीचा जिव घेतला. त्याने तिचा जिव घेण्यामागचे जे कारण सांगितले, ते सगळ्यांसाठीच धक्कादायक होते. पनवेल पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 29 मे रोजी विमानतळाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.

या तपासा दरम्यान समोर आले की, या प्रियकराची प्रेयसी लग्नासाठी त्याच्या मागे लागली होती. परंतु या प्रेयसीला गंभीर आजार असल्याने त्या युवकाने त्याच्या प्रेयसीला केटामाईन इंजेक्शन दिले. आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याच्या मैत्रिणीला एक गंभीर आजार आहे आणि म्हणूनच त्याला तिच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा नव्हती.

प्रेयसीला या आजारासाठी औषध देण्याच्या बहाण्याने आरोपीने केटामाईन इंजेक्शन दिले. यानंतर या प्रेयसीचा मृत्यू झाला. ऑपरेशन दरम्यान रुग्णाला बेशुद्ध करण्यासाठी केटामाईनचा वापर केला जातो. जर हे औषध जास्त प्रमाणात शरीरात गेले तर, यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.

त्या प्रेयसीजवळ कोणताही आयडी किंवा कागदपत्र नसल्याने मृतदेहाची त्वरित ओळख पटली जाऊ शकली नाही. रविवारी एका ऑटो चालकाला एक बॅग सापडली, त्यात महिलेचे आधार कार्ड, एक पर्स आणि काही कपडे सापडले. नंतर रमेश थोंबरे नावाच्या व्यक्तीने स्वतःला मृत महिलेचा भाऊ म्हणून सांगितले. त्यांनी ऑटो चालकाकडून सापडलेल्या वस्तूंचीही ओळख पटविली आणि ती महिला आपली बहिण असल्याचे सांगितले.

थोंबरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले की, पनवेलमधील एका रूग्णालयात काम करणाऱ्या चंद्रकांत गायककर सोबत आपल्या बहिणीचे प्रेमसंबंध आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की, त्या दोघांमध्ये काही कारणामुळे वाद देखील सुरु होते. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी एक टीम पाठवण्यात आली. चौकशी केल्यानंतर गायकरने आपला गुन्हा कबूल केला. गेल्या 6 महिन्यांपासून त्या महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्या महिलेला गंभीर आजार असल्याने ती आपल्यावर लग्नासाठी दबाव आणत असल्याचे ही त्याने सांगितले.

त्यानंतर या जाचाला कंटाळून त्याने तिला ठार मारण्याचा निर्णय घेतला. गायकरच्या म्हणण्यानुसार त्याने केटामाईनचे इंजेक्शन घेतले आणि तो त्याच्या प्रेयसीशी खोटं बोलला की, हे इंजेक्शन घेतल्याने तिचा आजार बरा होईल. त्यानंतर त्याने हेही कबूल केले की, हत्येनंतर त्याने गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मोबाईल फोन आणि बॅग लांब फेकून दिली. सोमवारी गायकर यांना न्यायालयात हजर केले असता, त्याला 6 जूनपर्यंत रिमांडात पाठविण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

3 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

4 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

5 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago