Categories: Editor Choice

कासारवाडी दत्त मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात रंगला हरिनामाचा गजर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ डिसेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथे श्री दत्तसाई सेवा कुंज आश्रम मंदिरात, दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. पहाटे काकडारतीपासून सुरुवात होत गुरू चरित्र ग्रंथांचे पारायण, महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी हरिपाठ, दररोज कीर्तन सेवा अशा धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने पिंपळे गुरव-कासारवाडी परिसरातील वातावरण धार्मिक आणि प्रसन्नतेने भारावले आहे.

श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम कासारवाडी येथे दत्तजयंती निमित्त माननीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि मित्रपरिवार यांच्या वतीने सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज तिसऱ्या दिवसाची किर्तनसेवा ह.भ.प.श्री. उमेश महाराज दशरथे (आळंदी) यांनी केली.

आजच्या कीर्तन सेवेत उमेश महाराज दशरथे यांनी भगवतगीता काय आहे? ,या जगात देव आहे का? याचा भावार्थ महाराजांनी आपल्या अभांगत अनेक उदाहरणे देऊन सांगितला. ईश्वराच्या प्रसादाने काय मिळेल, जसा लहान नाला गंगेला मिळाला की ते पाणी गंगाजळ होते. अशी अनेक उदाहरणे देत त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली.

या किर्तन सप्ताहामध्ये संत तुकाराम महाराज मंदिर, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर, मावळ येथे साकारत असलेल्या भव्य मंदिरासाठी सोहळ्यात आलेल्या विविध भाविकांकडून १६ लाख रुपयांची देणगी देण्यात आली. यात गणेश पोपटराव सोनावणे यांच्या वतीने रु. ११ लाख ११हजार १११ तर बबनराव येडे रु.१ लाख ११हजार १११, सौ. सुशिला आनंदराव चौगूले १ लाख ११११, श्री विजयआ ण्णा गणपतराव जगताप १ लाख, सौ. प्रभावती दौलतराव कामठे रु. १ लाख, आणि आदित्य सुधाकर पवार, रंगनाथ गेणूजी हरिहर, सुर्यमान मुकुटराव कावगुडे, विशाल बाजीराव रोडें, शिवाजी भगवान मोरे, मृणाल सुरज बारटक्के, प्रदिप दत्तात्रय लोहार, प्रथमेश मोरे यांनी प्रत्येकी पाचशे रुपये देणगी दिली भांडरा डोंगर ट्रस्ट कडे सोपविण्यात आली.

आज या सोहळ्याला श्री दत्तसाई सेवा कुंज आश्रमाचे शिवानंद स्वामी यांच्या समवेत पुणे शहराचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तसेच बाळासाहेब काशीद, मा. महापौर माई ढोरे, भाजप चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप,विराज आप्पासो रेणुसे, गिरीराज तानाजीराव सावंत, आरतीताई चोंधे, माधवीताई राजापुरे, उषाताई मुंडे, झेंडे अक्का, उज्वलाताई गावडे, हभप प्रमोद महाराज पवार (युवा कीर्तनकार) , काळूराम इंगवले (प्रवचनकार), ह भ प दौलत कामठे, नितीन इंगवले, तुषार तरस, संजय जगताप, जयवंत देवकर, जीवन जाधव,स्वप्नील भोसले, देवदत्त लांडे , पांडुरंग ढमाले, जगनाथ नाटकपाटील आदी मान्यवर व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago