Categories: Editor ChoiceSports

पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी अर्ध मॅरेथॉनचे आयोजन … शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन आणि उन्नती फाऊंडेशनचा उपक्रम!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ डिसेंबर) : ‘ उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी रस्ते सुरक्षा ‘ असे ब्रिदवाक्य घेऊन रस्ते सुरक्षा विषयी आणि आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन आणि उन्नती फाऊंडेशन यांच्या सहकार्याने किशान स्पोर्टस इंडिया प्रा . लि . यांनी रविवारी ५ डिसेंबर रोजी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी प्रसिध्दीस दिली आहे .

दिनांक ५ डिसेंबर येत्या रविवारी पहाटे पाच वाजता पिंपळे सौदागर येथिल कुणाल आयकॉन रस्त्यावरील सार्वजनिक पटांगण येथे स्पर्धेस प्रारंभ होऊन समारोपही त्याच ठिकाणी होणार आहे .

▶️🏃🏻‍♂️🏃‍♀️असा असेल स्पर्धेचा मार्ग :-

🏃🏻‍♂️२१ कि . मी . स्पर्धेचा मार्ग कुणाल आयकॉन रोड चौक -कोकणे चौक- गोविंद चौक शिवार – स्वराज गार्डन नाशिक फाटा उड्डाणपूल उतरुन पुन्हा यु टर्न मारुन पुन्हा त्याच मार्गाने – कुणाल आयकॉन रोड येथिल सार्वजनिक पटांगण , आणि पुन्हा त्याच मार्गाने दुसरी फेरी पुर्ण करणे असा २१ कि.मी. चा मार्ग आहे .

🏃‍♀️तर १० कि.मी. चा मार्ग वरील प्रमाणेच एक फेरी पूर्ण करणे असा आहे .

🏃🏻‍♂️५ कि.मी.चा मार्ग कुणाल आयकॉन रोड शिवार चौक कोकणे चौक कुणाल आयकॉन रस्तावरील सार्वजनिक पटांगण असा आहे .

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार लक्ष्मणभाऊ जगताप , व २९ वेळा आयर्न मॅन ‘ हा किताब मिळविणारे ज्येष्ठ क्रिडापटू डॉ . कौस्तुभ राडकर , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील , पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या उपस्थितीत होणार आहे .

स्पर्धेत पाच , दहा आणि एकवीस कि . मी . च्या या मॅरेथॉन स्पर्धेत स्त्री पुरुष अशा दोन्ही विजेत्यांना स्वतंत्र बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे . तसेच ४० वर्षांहून जास्त वयातील स्त्री पुरुष विजेत्यांना स्वतंत्र बक्षिस देण्यात येणार आहे .

विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना पदक , टी शर्ट , अल्पोहार , प्रमाणपत्र , गुडी बॅग व फोटो देण्यात येणार आहे . शंतनू प्रभूणे , सुखदेव सिंग ठाकूर आणि किरण काकुलते यांनी संयोजनात सहभाग घेतला होता अशीही माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रसिध्दीस दिली आहे .

▶️स्पर्धेची काही माहिती करीता संपर्क :-
साहिल ९०६७४७४३६० ,
सुखदेव ७०८३७६७७७२ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

9 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago