Google Ad
Uncategorized

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमित्ताने … भाजप शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या वतीने महामानवांना अभिवादन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑगस्ट) : आपल्या लेखणीतून गोरगरीब-वंचित घटकांची व्यथा प्रखरपणे मांडणारे, थोर समाजसुधारक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती तसेच स्वातंत्र्यलढ्यात “भारतीय असंतोषाचे जनक” म्हणून ज्यांचा उल्लेख अभिमानाने केला जातो, असे भारतमातेचे थोर सुपुत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी.

यानिमित्त भाजप शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांनी मोरवाडी येथील भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयामध्ये महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Google Ad

यावेळी भाजपा कार्यकारिणी सदस्य श्री.सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते श्री.नामदेव ढाके, मा.स्थायी. समिती अध्यक्ष श्री.विलास मडीगेरी, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ.उज्वलाताई गावडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.राजू दुर्गे, पिंपरी विधानसभा प्रमुख श्री.अमित गोरखे, श्री.मनोज तोरडमल व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!