भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नगरसेवक राजू बनसोडे यांच्या वतीने अभिवादन … छत्रपती शिवाजी महाराजांनाही केले नमन!

महाराष्ट्र 14 न्यूज : परमपूज्य, बोधीसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त दापोडी येथे त्यांच्या पुतळ्यास नगरसेवक राजू बनसोडे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याच प्रमाणे त्यांनी दापोडी येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण केला.

याप्रसंगी उपस्थित शहराच्या महापौर माई ढोरे, उपमहापौर हिराबाई नानी घुले,विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेविका सुलक्षना धर, युवक उपाध्यक्ष शेखर काटे,रवि कांबळे, प्रा.गोरख ब्राम्हणे,नरेश सुतार,अॅलेक्स दास,भाऊसाहेब मुगुटमल,विपुल साठे,सोन्या जगताप,तुषार चाळके,सुशांत वंजारी याप्रसंगी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरात सर्व ठिकाणी राष्ट्रपुरुष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. गेल्यावर्षी व याही वर्षी कोरोनामुळे मिरवणूक व अन्य कार्यक्रम झाले नाहीत. परंतु सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी सर्वांनी घरात बसून घेतली, यावेळी सर्वांनी कोरोनाचे नियम पाळत जयंती कार्यक्रमात सहभाग घेतला. यामुळे पोलिस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला नाही. अशी दक्षता सर्वांनी घेतली, आणि नागरिकांनी सहकार्य केले, तर लवकर कोरोनाचे संकट आपण हद्दपार करू असेही ‘नगरसेवक राजू बनसोडे’ यावेळी बोलताना म्हणाले.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago