Google Ad
Uncategorized

दादा येणार? भाई जाणार… तर, भाजपसाठी अजित पवार ठरणार संकटमोचक? कोण आहे सूत्रधार?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ एप्रिल) : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ होणार असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता आणखी एका दाव्याने खळबळ उडाली आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पायउतार होणार असून राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे सूत्रे हाती घेणार असल्याचे वृत्त ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपसोबत सत्ता स्थापन करणार आहे. मात्र, या आघाडीला शरद पवार यांनी आपला पाठिंबा दिला नाही.

2019 मध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ता स्थापनेचा प्रयोग फसला होता. त्यावेळी 80 तासांचे सरकार स्थापन झाले होते. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा अजित पवार हे सक्रीय झाल्याची चर्चा सुरू असताना हे वृत्त समोर आले आहे. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याची घाई असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

Google Ad

राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेत्यांनुसार, भाजपसोबतच्या या आघाडीला शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मात्र, पवार हे भाजपसोबत जाण्यास उत्सुक नाहीत. भाजपसोबत आघाडी करून शरद पवार यांना राजकीय कारकिर्दीत उजव्या शक्तींसोबत जाण्याचा कलंक लावून घ्यायचा नाही, असे . ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने म्हटले आहे. शरद पवार हे अजूनही जनभावना बदलू शकतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन निर्णय घेणे म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याची जाणीव राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पवार यांच्या पाठिंब्यासाठी धडपड सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी अजित पवार यांनी स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घेण्यास सांगितले आहे. अजित पवार यांच्यासोबत जवळपास 35 आमदार असल्याचे म्हटले जात आहे.

भाजपसाठी अजित पवार ठरणार संकटमोचक?

पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावले असले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य यांची लोकप्रियता वाढली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, राज्यातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 33 जागा मिळतील, असा अंदाज आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्र गमावणे परवडणारे नाही, असे ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने सूत्राच्या हवाल्याने सांगितले. भाजपला मुख्यमंत्री म्हणून मराठा चेहरा हवा आहे. जेणेकरून राज्यातील 35 टक्के मराठा मतदारांवर प्रभाव पाडता येऊ शकतो. अजित पवार यांच्या मार्फत हा मतदार आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न भाजपचा आहे.

या नव्या आघाडीचे सूत्रधार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल हे सूत्रधाराची भूमिका बजावत असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. यावेळी प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत नव्हते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!