Google Ad
Uncategorized

‘News 18 लोकमत’ चे गोविंद वाकडे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र निमंत्रक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ मार्च) :: न्यूज 18 – लोकमतचे पिंपरी – चिंचवड चे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..राज्य निमंत्रक एस.एम देशमुख यांनी आज येथे घोषणा केली.. पुढील दोन वर्षांसाठी ही नियुक्ती असेल.

गोविंद वाकडे गेली पंधरा वर्षे पत्रकारितेत आहेत.. मुळचे यवतमाळ जिल्ह्य़ातील उमरखेडचे रहिवासी असलेले वाकडे अगोदर न्यूज 18 लोकमतचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी होते .. नंतर पुणे प्रतिनिधी म्हणून आणि गेली दहा वर्षे पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत..
गोविंद वाकडे याच्या नियुक्तीबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे आणि विभागीय सचिव अरूण तथा नाना कांबळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे…

Google Ad

तर राज्यभरातील पत्रकारांच्या विविध संघटना , त्याचं बरोबर सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्व क्षेत्रातून वाकडे यांचं अभिनंदन होतं आहे

एस.एम.देशमुख सर आणि पत्रकारांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आपण सार्थ ठरवणार असल्याचं सांगत
अलीकडे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांवर होणारे हल्ले, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात होणारी उपेक्षा , संस्थेकडून होणारी पिळवणूक ,पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि निर्भिड पत्रकारिता जपनाऱ्या सोबत उभं राहण्याचा मानस असल्याच – गोविंद वाकडे म्हणाले.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!