Categories: Editor Choice

सरकार जनधन खात्यावर पेन्शन आणि इतर आर्थिक सहाय्यासह देते 2.30 लाखांची फ्री सुविधा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ऑगस्ट) : सरकारच्या पीएम जन धन योजनेला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. सामान्य जनतेला सरकारची ही योजना खूप आवडली आहे. या योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या काही वर्षांत तिप्पट झाली आहे.

फायनान्शिअल सर्व्हिस डिपार्टमेंटने (DFS) ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, पीएम जन धन योजनेच्या खात्यांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे. या खात्यांची संख्या मार्च 2015 मध्ये 14.72 कोटी वरून आतापर्यंत 43 कोटी खात्यांमध्ये वाढली आहे.

▶️पीएम जन धन योजनेमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत
या जगातील सर्वात मोठ्या आर्थिक समावेशक उपक्रमामुळे गरीब लोकांसाठी बँकांचे दरवाजे उघडले आहेत आणि त्यांना जन धन खाते पासबुक आणि रुपे कार्डची नवीन शक्ती मिळाली आहे. या योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर प्रत्येकाला स्वस्त विमा, पेन्शन आणि इतर आर्थिक उत्पादनांची सुविधा दिली जाते.

▶️2.30 लाखांचा लाभ मिळवा
जन धन खातेधारकांना 2.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. जन धन खातेधारकांना कोणत्याही बँकेत खाते उघडल्यावर अपघाती विमा संरक्षण दिले जाते. 1,00,000 रुपयांचा अपघात विमा आणि 30,000 रुपयांचा सर्वसाधारण विमा खातेदारांना दिला जातो. खातेदाराचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याला 2 लाख रुपये दिले जातात. या संदर्भात, जन धन खातेधारकाला 2.30 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते.

▶️खाते कसे उघडावे ?
प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये खाते उघडले जाते. पण, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे जनधन खाते एका खाजगी बँकेतही उघडू शकता. तुमच्याकडे इतर बचत खाते असल्यास तुम्ही ते जन धन खात्यात रूपांतरित करू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, जन धन खाते उघडू शकतो.

▶️कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल
जन धन खाते उघडण्यासाठी, कागदपत्रांची पडताळणी KYC अंतर्गत केली जाते. या कागदपत्रांचा वापर करून जन धन खाते उघडता येते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड.

▶️या बँकांमध्ये खाती उघडता येतात
प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अधिक खाते उघडले जाते. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जन धन खाते उघडू शकता. पण, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे जनधन खाते एका खाजगी बँकेतही उघडू शकता.

▶️खाजगी बँकांमध्ये जन धन खाते उघडले?
धनलक्ष्मी बँक, येस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, फेडरल बँक, आयएनजी वैश्य, कोटक महिंद्रा, कर्नाटक बँक, इंडसइंड बँक जन धन खाते उघडण्याची सुविधा देते.

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

8 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

9 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago