गोपीचंद पड़ळकरांनी बारामतीच्या दौऱ्यावर विविध भागात घोंगड्या बैठकीतुन … बारामतीच्या जनतेला केले हे आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९जून) : बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. पवारांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार फुले- शाहू-आंबेडकर यांच्या खऱ्या वारसदारांच्या संविधानिक हक्कांवर गदा आणण्याचे व त्यांचा गळा घोटण्याचे महापाप करत असल्याचेही पडळकर यांनी म्हटले.

ते शनिवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पड़ळकर आज बारामतीच्या दौऱ्यावर असून बारामतीच्या विविध भागात वंजारी,तेली, शिंपी, माळी, रामोशी समाजाच्या घोंगड्या बैठका घेत आहेत. यावेळी त्यांनी बारामतीच्या जनतेला पवारांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचे आवाहन केले. गोपीचंद पडळकर यांनी पवारांच्या बालेकिल्ल्यातूनच त्यांच्यावर तोफ डागल्याने आता राष्ट्रवादीचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. तुम्ही मला कोणाबद्दल विचारताय? बारामतीकरांनी ज्याचं डिपॉझिट जप्त केलं त्याच्याविषयी काय बोलायचं, अशी खोचक टिप्पणी अजित पवार यांनी केली.

▶️‘अजित पवारांना प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करण्यासारखं’

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या मुद्द्यावरुन मध्यंतरी गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले होते. अजित पवार यांना मागासवर्गीय नोकरी पदोन्नती आरक्षण उपसमितीचे प्रमुख करणे म्हणजे मेंढरांनी लांडग्याकडून संरक्षणाची अपेक्षा करावी, असं होईल, असे पडळकर यांनी म्हटले होते.

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

9 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

9 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago