Categories: Editor Choice

खुशखबर : सोनं झालं स्वस्त … आणखी किती कमी होणार किंमत , वाचा सविस्तर!

महाराष्ट्र 14 न्यूज : आज सलग चौथ्या दिवशी सोन्याचांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. गुरुवारी (ता. १९) मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याची वायदा किंमत ०. ३ टक्क्यांनी कमी झाली आहे. दरम्यान, ५०,१८० रुपये प्रति तोळा झाली आहे, तर चांदीची वायदा किंमत ०. ८ टक्केने उतरले आहेत. आज सोन्याचे भाव जवळपास ४५० रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदी ७१८ रुपयांनी कमी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर ५६,२०० रुपये प्रति तोळा असा उच्चांक गाठला होता. आतापर्यंत यामध्ये साधारण ६००० रुपयांची घसरण झाली आहे. घसरणीनंतरचा भाव ६२,०४३ रुपये प्रति किलो झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील घसरण
कोव्हिड-19 व्हॅक्सिन (COVID-19 Vaccine) लवकरच उपलब्ध होईल अशी अपॆक्षा आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव ०. १ टक्क्याने कमी होऊन १,८६९. ८६ डॉलर प्रति औंस झाले आहेत. याठिकाणी चांदीचे भाव ०. ३ टक्क्याने कमी होऊन २४. २४ डॉलर प्रति औंस झाले आहेत. डॉलरने सोन्यावर दबाव वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचे दर कमी झाले आहेत.

विश्लेषकांच्या मते, अनेक कारणांमुळे सोन्याचे दर याच रेंजमध्ये आहेत. कोरोना व्हायरस लशीसंदर्भात आलेल्या चांगल्या बातम्यामुळे सोन्यावरील दबाव वाढला आहे. मात्र अद्याप कधीपर्यंत लस उपलब्ध होईल हे स्पष्ट झाले नाही आहे. सोन्याचे भाव १, ८५० डॉलर प्रति औंसवर पोहोचून देखील ते १,९०० डॉलरच्या स्तरापर्यंत पोहोचले नाही.


Pfizer ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे व्हॅक्सिन ९५ टक्के प्रभावी आहे. या लशीने अमेरिका फूड अँड ड्रग अॅमिनिस्ट्रेशन (USFDA) द्वारे आपातकालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या सुरक्षा मानकांची पूर्तता केली आहे. Pfizer आता येणाऱ्या काही दिवसात अमेरिका आणि युरोपियन नियामकांकडून मान्यता मिळवेल. डॉलर इंडेक्समध्ये ०. ६ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे इतर चलन असणाऱ्यांसाठी सोने महागलं आहे

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago