Categories: Uncategorized

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरीकांना सुवर्ण संधी … मंगळवार दिनांक ०५ डिसेंबर रोजी राहटणी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ डिसेंबर) : जनतेला शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाच्यावतीने ‘शासन आपल्या दारी’ही विशेष मोहीम राज्यभर राबवली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरीकांना याचा लाभ मिळावा या उद्देशाने आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप व भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून संजय गांधी योजना समिती चिंचवड विधानसभा पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालय, संजय गांधी विभाग कार्यालय पुणे, मुळशी तहसील कार्यालयं यांच्या संयुक्त विद्यमाने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार दिनांक ०५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत थोपटे लॉन्स मंगल कार्यालय, रहाटणी, पुणे-१७ या ठिकाणी हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमातून आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरांमध्ये विविध गावांमध्ये अकरा वेळा शिबिर भरवण्यात आलेले आहे. या शिबिराच्या माध्यमातून अंध, अपंग, मुकबधिर, कर्णबधिर ,मतिमंद, विधवा महिला, घटस्फोटीत महिला, तसेच श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना फक्त मुली असणारे, दरमहा पंधराशे रुपये पेन्शन मिळवून दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाभार्थ्याच्या बाबतीत चिंचवड विधानसभा एक नंबरला आहे तसेच आयुष्मान भारत कार्ड ही पण योजना यामध्ये होणार आहे. या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, महा-ई-सेवा केंद्र उपस्थित राहणार आहेत, यामुळे लाभार्थ्यांचा वेळ व पैसा वाचणार आहे एकाच ठिकाणी एक दिवसांमध्ये पेन्शन सुरू होण्यास मदत होणार आहे.

खालील योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या नागरीकांनी या प्रमाणे पेपर सोबत आणावे :

▶️अपंग :-
५ वर्षावरील मुलांपासून पेन्शन योजना सुरु आहे. ४०% पुढील अपंगानी अर्ज करावा.

१) दोन फोटो २) अपंग असल्याचा सरकारी हॉस्पीटलचा दाखला ३) आधार कार्ड ४) रेशन कार्ड ५) शाळेचा दाखला किंवा हॉस्पीटलचा वयाचा पुरावा ६) मुलांचे बोनाफाईट किंवा जन्म दाखला ७) लाईट बिल स्वतःचे (भाडेकरू असल्यास घरमालकाचे लाईट बिल व एक फोटो)

▶️विधवा महिला :-
विधवा महिलेचा मुलगा २५ वर्षापेक्षा मोठा असल्यास अर्ज करु नये.

१) दोन फोटो २) पतीचा मृत्यु दाखला ३) रेशन कार्ड ४) आधार कार्ड ५) स्वतःचा शाळेचा दाखला किंवा हॉस्पीटलचा वयाचा पुरावा ६) मुलांचे बोनाफाईट किंवा जन्म दाखला ७) लाईट बिल स्वतःचे (भाडेकरू असल्यास घरमालकाचे लाईट बिल व एक फोटो)

▶️आजार (क्षयरोग, पक्षघात, कर्करोग, एडस्, कुष्ठरोग)

१) दोन फोटो २) संबंधीत आजार असल्याचा सरकारी हॉस्पीटलचा दाखला ३) आधार कार्ड ४) रेशन कार्ड ५) शाळेचा दाखला किंवा हॉस्पीटलचा वयाचा पुरावा ६) मुलांचे बोनाफाईट किंवा जन्म दाखला ७) लाईट बिल स्वतःचे (भाडेकरू असल्यास घरमालकाचे लाईट बिल व एक फोटो)▶️महिला व मुले (घटस्फोटीत, अत्याचारित परित्यक्त्या महिला व अनाथ मुले)
१) दोन फोटो २) घटस्पोटाचे कोर्टाचे पेपर ३) अनाथ असल्यास आई वडिलांचा मृत्यु दाखला ३) रेशन कार्ड ४) आधार कार्ड ५) स्वत:चा शाळेचा दाखला किंवा हॉस्पीटलचा वयाचा पुरावा ६) बोनाफाईट किंवा जन्म दाखला ७) लाईट बिल स्वतःचे (भाडेकरू असल्यास घरमालकाचे लाईट बिल व एक फोटो)

▶️ज्येष्ठ नागरिक(श्रावण बाळ योजना)

वय ६५ पुर्ण असणे बंधनकारक व मुलगा नसेल तरच पेन्शनसाठी अर्ज करावा. (मुलगी चालेल)

१) दोन फोटो २) रेशन कार्ड ३) आधार कार्ड ४) स्वतःचा शाळेचा दाखला किंवा हॉस्पीटलचा वयाचा पुरावा (औंध रुग्णालय, ससुन हॉस्पीटल किंवा वाय.सी.एम.) ५) लाईट बिल स्वतःचे (भाडेकरू असल्यास घरमालकाचे लाईट बिल व एक फोटो)

▶️आयुष्यमान भारत कार्ड :- प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड ५००,०००/- रूपयाची वैद्यकिय सवलत करीता कागदपत्रे आधारकार्ड व रेशनकार्ड सोबत आणावेत.

या शिबिरासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख तहसीलदार अर्चना निकम तहसीलदार रणजीत भोसले तहसीलदार अमोल कदम पिंपरी चिंचवड शहराचे आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे उपस्थित राहणार आहेत .

हे शिबिर यशस्वी होण्यासाठी स्वीकृत नगरसेवक मा. संजय गांधी योजना अध्यक्ष गोपाळ माळेकर अध्यक्ष नरेंद्र माने, सदस्य संजय मराठे, अदिती निकम, दिलीप गडदे, राजेंद्र पाटील व सहकारी शिबिर यशस्वी होण्यासाठी तयारी करत आहेत. तरी पिंपरी चिंचवड शहरातील गरजू लाभार्थ्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप व भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांनी केले आहे .

टीप : तलाठी उत्पन्न दाखला, मंडल अधिकारी अहवाल, तहसिल उत्पन्न दाखला, संमतीपत्र ही सुविधा जागेवर उपलब्ध आहे.

मंगळवार दिनांक ०५ डिसेंबर २०२३ रोजी
वेळ :- सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत

स्थळ : थोपटे लॉन्स मंगल कार्यालय, रहाटणी, पुणे-१७.

Maharashtra14 News

Recent Posts

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन …. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपक्रम

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन  - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…

2 days ago

एकाच तिकीटावर मुंबईकरांना सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरता येणार’

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…

4 days ago

महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा झाला सैन्यदलात लेफ्टनंट…* *आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते नवनियुक्त लेफ्टनंट शिवराज मोरे यांचा सन्मान..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…

2 weeks ago

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शाम जगताप यांच्या वतीने … पिंपळे गुरव परिसरात २० हजार नागरिकांना दिनदर्शिका वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…

3 weeks ago

स्वच्छतेमुळेच पेशंट बरे होण्यास मदत होते – नवनिर्वाचित आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालयास भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…

3 weeks ago