Google Ad
Uncategorized

सोन्याला आज पुन्हा झळाळी, चांदीही चकाकली ; जाणून घ्या आजचा भाव

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ सप्टेंबर) : दर आठवड्यात सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कमी झालेला सोन्याचा भाव या आठवड्यात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सोने खरेदीदारांना पुन्हा एकदा फटका बसणार आहे.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,४८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७४,८२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

Google Ad

मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,४३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,५२३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,४८० प्रति १० ग्रॅम आहे.पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५२३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५२३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५२३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४८० रुपये आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!