महाराष्ट्र 14 न्यूज : सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क आवश्यक केले आहे. 1 जून 2021 नंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकले जाऊ शकत नाहीत. भारतीय मानक ब्यूरो अर्थात बीआयएसने सर्व नोंदणीकृत ज्वेलर्सना एक अधिसूचना जारी केलीय. सोन्याची शुद्धता आता तीन श्रेणींमध्ये विभागली जाणार आहे. प्रथम 22 कॅरेट, दुसरा 18 कॅरेट आणि तिसरा 14 कॅरेटचे टप्पे असतील. ग्राहक आणि ज्वेलर्स दोघांनाही याचा फायदा होणार आहे. या गुणवत्तेबद्दल या दोघांमध्येही स्पष्टता आहे.
ज्वेलर्स असोसिएशनच्या मागणीनुसार ती मुदत 1 जून 2021 पर्यंत वाढवली
घर बसल्या BIS नोंदणी करा
बीआयएसकडे नोंदणी प्रक्रिया ज्वेलर्ससाठी अधिक सोपी केली गेली आहे. हे काम आता घरूनही करता येईल, यासाठी www.manakonline.in या संकेतस्थळावर जा. ज्या कागदपत्रांची मागणी केली आहे, ती सबमिट करायची आहेत आणि नोंदणी फी जमा करावी लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदार बीआयएसचा नोंदणीकृत ज्वेलर्स बनतो.
नोंदणी फी किती आहे हेसुद्धा जाणून घ्या
बीआयएस नोंदणी फीसुद्धा खूप कमी ठेवण्यात आलीय. जर ज्वेलर्सची उलाढाल 5 कोटींपेक्षा कमी असेल तर यासाठी नोंदणी फी 7500 रुपये आहे, पाच कोटी ते 25 कोटी दरम्यानच्या उलाढाल असल्यास नोंदणी फी वर्षाकाठी 15 हजार रुपये आणि 25 कोटी असू शकते, तर अधिक उलाढालीसाठी नोंदणी फी 40 हजार रुपये आहे. जर ज्वेलर्सची उलाढाल 100 कोटींच्या पलीकडे असेल तर ही फी 80 हजार रुपये आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…