Panwel : नाताळ आणि थर्टी फर्स्टला बाहेर जाताय … पोलीस म्हणतायत, है तैयार हम….

महाराष्ट्र 14 न्यूज : २५ डिसेंबर चा नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वगतासाठी ग्रामीण भाग, विशेषत: पर्यटन स्थळांकडे येणारे लोंढे पाहता आता येथेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या शहरांप्रमाणंच रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात येण्याची चिन्हं आहेत. इतकंच नव्हे, तर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पनवेल तालुक्यात होणारी गर्दी पाहता यावरही पोलीस यंत्रणांची करडी नजर असणार आहे.
31 डिसेंबर अर्थात थर्टी फर्स्टला नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईतून नजीकच असणाऱ्या पनवेलच्या दिशेनं अनेकांचाच रोख असतो. शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळं इथं येणाऱ्यांची गर्दी कायमच जास्त असते. त्यातही नववर्ष, ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर तर इथं गर्दी होणार हे नक्की.

शहरांतून इथं येणाऱ्यांकडून पनवेल तालुक्यातील विविध फार्महाऊसना पसंती दिली जाते. यामध्ये काही सेलिब्रिटींच्याही फार्महाऊसचा समावेश आहे. या भागात जवळपास 400 ते 500 फार्महाऊस असल्यामुळं पोलिसांनी 31 डिसेंबरच्या धर्तीवर या भागात चोख बंदोबस्त ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागांत असणाऱ्या फार्महाऊसवर रात्रभर धिंगाणा चालू नये यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन हाती घेतलं जाणार आहे. 31 डिसेंबरच्या दरम्यान दोन – तीन दिवसांआधीपासूनच या भागात होणारी वर्दळ पाहता सर्व हालचालींवर पोलिसांची करडी नजर असेल.

नव्या वर्षाच्या स्वगतासाठी या भागात शहरांतून अनेकजण जमतात. पनवेलच्या हद्दीत अनेक फार्महाऊस असल्यामुळं शहरी भागांतून इथं येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण, यंदाची परिस्थिती वेगळी आहे. कोविड परिस्थितीनुळं जे निर्बंध शासनानं आखले आहेत त्या अनुषंगानं त्या नियमांचं पालन करायचं आहे असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. यासाठी पोलीस यंत्रणा सर्वतोपरी तयार आहे. थर्टी फर्स्टच्या धर्तीवर या भागातील फार्महाऊस मालकांशी आपल्या बैठका झाल्या असून, त्यांनाही सर्व निर्बंध आणि नियमांसंबंधीच्या सूचना देण्यात येणार असल्याचं पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं यंदाचा थर्टीफस्ट हा पोलिसांच्या नजरेतच जाणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago