महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ ऑक्टोबर) : २७ वर्षापासून महाराष्ट्रभरात अश्विन शुद्ध प्रतिपदा (घटस्थापना) ते अश्विन शुद्ध दशमी( विजयादशमी )श्री दुर्गामाता दौड हा धार्मिक तसेच सांस्कृतिक उपक्रम होतो.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी-पिंपळे गुरव भागात देखील १५ ते २४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हा उपक्रम विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे. श्री दुर्गा माता दौड ही पूर्णतः पारंपारिक पद्धतीचा उपक्रम असून यात ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यात येत नाही तर केवळ देव देश धर्म भक्ती गीते व घोषणा दिल्या जातात तसेच दवडीच्या पुढे महाराष्ट्र भागवत धर्माची पताका म्हणून मानाचा भगवा ध्वज ठेवण्यात येतो. श्री दुर्गा माता दौड ही राजकारण सत्ता कारण अर्थकारण विरहित असून केवळ आणि केवळ देश धर्म देव काढण्यासाठीच आयोजित करण्यात आली. या उपक्रमाला शहरातील सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
जनमानसात हिंदु धर्म, संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार, तसेच नवरात्रीनिमित्त सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर करण्याच्या उद्देशाने ३० दशकांहून अधिक काळापासून राज्यभर हा उपक्रम राबवला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरामध्येही १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत आकुर्डी, निगडी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, ताथवडे, थेरगाव, हिंजवडी, काळेवाडी, पिंपरी, औंध आदी २० ठिकाणी दुर्गामाता दौड काढली जात आहे.
गावोगावी देव, देश आणि धर्म यांविषयी जागृती करण्यासाठी तरुण-तरुणी एकत्र येतात अन् छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्फुलिंग जागवण्यासाठी दुर्गामाता दौडीचे आयोजन करत आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि बजरंग दल दुर्गा वाहिनीच्या वतीने आदिमाया आदिशक्तीचा जागर करण्यात येत असतो. प्रतिदिन सकाळी ६ वाजता प्रत्येक ठिकाणी धारकरी एकत्र येऊन एका मंदिरापासून दुसर्या मंदिरापर्यंत हातात भगवे ध्वज आणि डोक्यावर भगवी टोपी परिधान करून श्री दुर्गादेवी, भारतमाता आणि वीर पुरुष यांचा जयजयकार करतात. यामुळे प्रत्येकात राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे, या उदात्त हेतूने ही दुर्गादौड काढली जाते.
यावेळी बोलताना कु.प्राची गायकवाड म्हणाल्या, “पिंपळे गुरव मध्ये तुळजाभवानी मंदिरापासून दौडीस सुरवात केली. आज पासून पुढील ६ दिवस म्हणजेच विजयादशमी पर्यंत आम्ही हि मोहीम पूर्ण पिंपळे गुरव मध्ये राबवणार आहोत.विजयादशमी च्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात सांगवी या ठिकाणी महादौडीचे नियोजन केले आहे. मोहीम फक्त नवरात्रीत नव्हे तर वर्षभर पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात कशी राबण्यात येईल हा विचार करत आहोत. प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला आम्ही दुर्गामाता दौड हि मोहीम पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात राबवणार आहोत.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…