Categories: Uncategorized

जेनेसीस इंडिया च्या पदाधिकारी … प्रोमोही शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ऑक्टोबर) : जेनेसीस इंडिया संस्थेच्या पदाधिकारी प्रोमोही शिंदे यांनी सामाजिक बांधीलकी जपत निगडी प्राधिकरण येथील वृध्दाश्रमास भेट देऊन त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू व इतर साहित्य भेट देऊन वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

प्रोमोही शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुवर्णनगरी या वृध्दाश्रमास जेनेसीस इंडिया च्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली व तेथील जेष्ठ नागरिकांशी आपुलकीने संवाद साधला व या वृध्दाश्रमास सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही दिली. प्रोमोही शिंदे यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे व दाखविलेल्या सामाजिक जाणिवेबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी जेनेसीस इंडिया संस्थेचे अध्यक्ष अजित बोराडे, संस्थेचे महाराष्ट्र समन्वयक धर्मराज बनसोडे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य काशिनाथ शिंदे, दत्तात्रय व्हनकडे, प्रीतम काळे, रोहित चांदणे, कुणाल कांबळे, नितु कांबळे, नेहा कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

घरातील जेष्ठ मंडळींना सन्मानाने वागवणे व त्यांची सेवा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे मनोगत धर्मराज बनसोडे यांनी व्यक्त केले. जेष्ठ नागरिकांशी संवाद साधल्यामुळे व त्यांनी दिलेल्या आशीर्वादांमुळे अजून जास्त समाज कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रोमोही शिंदे यांनी सांगितले.

जेनेसीस इंडिया च्या सदस्यांनी आपले वाढदिवस साधेपनाने साजरे करावे, अनावश्यक खर्च टाळावा व त्या पैशातून गरजू लोकांना मदत करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अजित बोराडे यांनी केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

3 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

4 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

5 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago