” भारतरत्नांची चौकशी करणारे ‘ रत्न ‘ कुठेही सापडणार नाहीत ” … देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र!

महाराष्ट्र 14 न्यूज : देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले पाहायला मिळत आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या परदेशातील सेलिब्रिटींविरोधात ट्वीट करणाऱ्या भारतातील सेलिब्रिटीच्या ट्वीटची चौकशी आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. सरकारच्या या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. ‘भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत’, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले.

सेलिब्रिटींनी इंटरनॅशनल गायिका रिहानाच्या सोशल मीडिया पोस्टनंतर केलेल्या ट्विटरवरील पोस्ट्सच्या चौकशीची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली होती.यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी त्यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले. या सर्वांनी केलेल्या पोस्ट बहुतांशी एकसारख्याच जणू कॉपी पेस्टच होत्या. या पोस्ट त्यांनी कुणाच्या दबावाखाली येऊन केल्या त्याचा तपास केला जाणार आहे.

याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘संतापजनक ! कुठे गेला मराठीबाणा ? कुठे गेला महाराष्ट्रधर्म ? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा ! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे,’ अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 weeks ago