महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. १२ मार्च २०२३) :- स्पा सेंटरच्या नावाखाली आरोपीने पिडीत महिलांना पैशांचे अमिष दाखवले. त्यांना स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली प्राप्त केले. वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करुन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला. त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागवित असताना आढळून आला, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. १०) सायं. ७.३० च्या सुमारास रेनबो प्लाझा, शॉप नंबर ४१०, चौथा मजला, शिवार चौक, पिंपळे सौदागर येथील YOG THE स्पामध्ये घडली.
महिला फिर्यादीने निवृत्ती प्रकाश पाटील (वय २६ वर्षे, रा. रेनबो प्लाझा, शॉप नंबर ४१०, चौथा मजला, शिवार चौक, पिंपळे सौदागर, मुळ पत्ता अजंदे पो. पाठुंगी ता. रावेर जि.जळगांव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी आरोपी स्पा चालक मालकाच्या विरोधात २४३/२०२३ भा.द.वि. कलम ३७० (३) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…
महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, ७ ऑगस्ट, २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात एक…