Categories: Uncategorized

मोफत पास योजनेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची, या तारखेपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जुलै २०२३) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत  “दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएमएलचे मोफत बसपास देणे”  आणि  “महानगरपालिका हद्दीतील ६० वर्षापुढील अंध व्यक्तीच्या सोबतीस असणा-या व्यक्तीस बस प्रवासाचा मोफत पास” या दोन योजनांअंतर्गत  ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी १५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणा-या गरजूंनी  ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

          महापालिकेच्या वतीने समाज विकास विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत विविध योजना कार्यान्वित आहेत. महानगरपालिका हद्दीमध्ये राहणा-या दिव्यांग नागरिकांना तसेच महानगरपालिका हद्दीतील ६० वर्षापुढील अंध व्यक्तीच्या सोबतीस   असणा-या व्यक्तीला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता पीएमपीएमएलचे मोफत बसपास देण्याची योजना राबविली जाते. यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज स्विकृतीची मुदत दि. ३१ जुन २०२३ पर्यंत होती. ही  मुदत आता १५ ऑगस्ट पर्यंत  वाढवण्यात आली आहे.

 या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणा-या गरजूंनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकृती उपलब्ध करण्यात आलेली आहे. जुन्या पासधारकांनी त्यांच्याकडील जुने मोफत बसपास कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुणे-मुंबई रोड, पिंपरी या ठिकाणी जमा करावेत,  दिव्यांग नागरीकांनी मोफत बसपासचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या मुदतीतच ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावा, असे आवाहन समाज विकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी केले आहे.

या दोन्ही योजनांचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी योजनेच्या अटी व शर्तीनुसार आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती उपलब्ध करण्यात  आली असल्याचेही समाज विकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले  आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago