पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग अध्यक्षपदासाठी … भाजपच्या या नगरसेवकांची अध्यक्षपदी निवड पक्की!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी ९ तारखेला निवडणूक होणार आहे. तर, आज सोमवारी (दि. ५ ) अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस होता, यात जवळजवळ आठही उमेदवार निश्‍चित झाले आहेत. महापालिका निवडणुकांसाठी सव्वा वर्षांहून अधिक कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे निवडणुकांपूर्वी लाभाचे पद पदरात पाडून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच रंगणार आहे, असे वाटत होते. परंतु विरोधी पक्ष राष्ट्रवादीने एकही अर्ज दाखल न केल्याने निवड ही एकतर्फी होणार हे नक्की झाले, असून शिक्कामोर्तब होणे बाकी राहिले आहे.

महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी ३० सप्टेंबरपासून अर्ज वाटपास सुरुवात झाली. आज ५ तारखेला दुपारी ३ ते ५ या वेळेत इच्छुक उमेदवारांचे अर्ज त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयात स्विकारले गेले.

भाजपकडून ‘ अ ‘ प्रभाग अध्यक्षपदासाठी शर्मिला बाबर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे . ‘ ब ‘ प्रभाग सुरेश भोईर , ‘ क ’ प्रभाग राजेंद्र लांडगे , ‘ ड ‘ प्रभाग सागर आंगोळकर , ‘ ई ‘ प्रभाग विकास डोळस , ‘ ग ‘ प्रभाग अध्यक्षपदासाठी बाबा त्रिभुवन यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे . ‘ ह ‘ प्रभाग हर्षल ढोरे आणि ‘ फ ‘ अध्यक्षपदासाठी कुंदन गायकवाड यांचा अर्ज भरला आहे . महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत . विद्यमान अध्यक्षांचा वर्षाचा कार्यकाळ एप्रिल महिन्यातच संपला होता . प्रभाग समित्या बरखास्त होत नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर त्यांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ मिळाली होती . राज्य सरकारने निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे .

९ तारखेला सकाळी ११.३० पासून दुपारी ४ वाजेपर्यंत प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक चालणार आहेत. महापालिका प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात ही निवडणूक होईल.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका २०१७ मध्ये झाल्या. नगरसेवकांचा पाच वर्षांचा कालावधी २०२२ मध्ये संपत आहे. २०२२ मध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणुका होतील. त्यामुळे त्यासाठी आता जवळपास १ वर्ष आणि ४ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago