Categories: Editor Choice

राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या समस्या सोडविण्याला प्रथम प्राधान्य – अन्न नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण..

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ डिसेंबर) : राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व सोलापूर विभागातील अन्न धान्य वितरण कार्यालयाच्या युनिटवाईज आधार सिडींग कामकाजाचा आज गुरुवारी (दि. १) रोजी मुंबईत आढावा घेण्यात आला. पुणे विभागाने ज्या पद्धतीने आधार सिडींगच्या कामकाजात मोठी आघाडी घेतली, त्याच धर्तीवर राज्यातील इतर विभागांनी देखील प्रशंसनीय कामकाज करावे. दुकानदारांना भेडसावणाऱ्या Epos मशीनच्या अडचणीबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल. रास्त भाव दुकानदारांच्या आर्थिक उत्पन्नवाढीकरिता विविध उपाययोजना राबविण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

पुणे विभागातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील अन्न धान्य वितरण अधिकारी सुरेखा माने आणि सुमित शिंदे तसेच रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष यांना राज्याचे पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे आणि मंत्री महोदय रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी पुणे विभागाचे उपायुक्त (पुरवठा) डॉ. त्रिगुण कुलकर्णी, राज्याचे पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशनचे पुणे जिल्हा व विभागीय अध्यक्ष शहाजी लोखंडे, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चिंतामणी सोंडकर, खजिनदार विजय गुप्ता आदी उपस्थित होते.

आढावा बैठकीत ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरातील दुकानदारांच्या समस्यांचा उहापोह केला. त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. २०२१-२०२२ सालाचे कमिशन आद्यपर्यंत मिळालेले नाही. बहुतांशी ठिकाणी जुलैपासून मशिन्स बंद आहेत. अहमदनगर जिल्हयातील जून आणि सांगली जिल्हयातील जून तसेच जुलै अशा दोन महिन्याचा डेटा अजूनपर्यंत उपलब्ध झालेला नाही. सॉफ्टवेअर अपडेशन रखडले आहे. वयस्कर कार्डधारक ज्यांचे दोन युनिटचे कार्ड आहे.

त्यांचे अंगठ्यांचे थंब करताना अडचणी उद्भवत आहेत. धान्य मशीनमध्ये वेळेवर अपलोड होत नाही. कार्डधारकांचे अंगठ्याचे ठसे लवकर उमटत नाहीत, त्यासाठी मशिनवर आधार सर्व्हरचे काम करणे गरजेचे आहे. धान्य वाटप करताना बहुतांशी वेळा सिस्टीमला सर्व्हर येतो, त्यामुळे कार्डधारकांच्या क्रोधास दुकानमालकाला सामोरे जावे लागते. पूर्वीच्या एकल पावतीप्रमाणेच ग्राहकांना धान्य वाटप व्हावे. त्यात बदल न होता केवळ एकदाच अंगठयाचा ठसा प्रविष्ट करावा, जेणेकरून ग्राहकांना विनाविलंब धान्य वाटप करता येईल. पूर्वी प्रमाणेच दोन्ही योजनांची एकत्रितपणे पावती देण्याची व्यवस्था करावी, अशा विविध समस्या मंत्री महोदयांच्या पटलावर उपस्थित केल्या.                             ——-

” ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यास मी प्राधान्य देणार आहे. त्यासाठी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन दुकानदारांची अडचणीतून मुक्तता करण्यासाठी पाउलं उचलण्यात येतील, असे आश्वासन पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले.”

विजय गुप्ता – खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन… 
Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

13 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago