Editor Choice

अखेर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश … नवी सांगवीतील राजाराम नगरच्या नागरिकांना संरक्षण विभागाने दिला रस्ता!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नवी सांगवी येथील राजाराम नगर परिसरातील नागरीकांचा अनेक दिवसांपासून असलेला रस्त्याच्या मागणीचा प्रश्न सुटला. नवी सांगवीतील राजाराम नगर हे संरक्षण विभागाच्या हद्दी लगतचा भाग असल्याने संरक्षण विभागा कडून आपल्या हद्दीला सिमा संरक्षण कंपाऊंड करण्याचे काम चालू करण्यात आले. त्यामुळे राजाराम नगर मधील नागरिकांची रस्त्याची समस्या निर्माण झाली होती. नागरिकांच्या दारातच कंपाऊंडचे खांब उभे करायला संरक्षण विभाग लागल्याने तेथील नागरिकांना जाण्या येण्याचा मार्ग बंद होत असल्याने नागरिक आणि संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊ लागले.

  1. सदर बाब आमदार लक्ष्मण जगताप यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी स्थानिक प्रतिनिधी माधवी राजापुरे, सिमा चौगुले आणि अंबरनाथ कांबळे यांना सुचना करून सदर ठिकाणी योग्य पर्याय शोधून नागरिकांची गैरसोय दुर करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. त्यावर स्थानिक नगरसेवक, नगरसेविका महापौर सौ.माई ढोरे यांना घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांना भेटून नवी सांगवी येथील राजाराम नगर मधील नागरिकांची गैरसोय होत असले बाबत माहिती देऊन संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां बरोबर संपर्क साधून चर्चा केली.

त्यातून चांगला मार्ग निघाला सदर ठिकाणी संरक्षण विभागाच्या हद्दी मधुन नागरिकांची गैरसोय दुर करण्यासाठी हद्दी खांबा पासुन अजुन ३ मीटर रुंदीचा रस्ता मोकळा ठेवावा आणि संरक्षण विभागाचे कंपाऊंड करावे सोडलेली जागा हि संरक्षण विभागाचीच असेल नागरिकांना फक्त जाण्या येण्याचा रस्ता म्हणुनच वापरता येईल.आज सोमवार दिनांक २४ ऑगस्ट २०२० रोजी सदर ठिकाणी संरक्षण विभागाचे अधिकारी श्री प्रकाश सिंग,श्री देवेंद्र सिंग पोलीस अधिकारी अजय भोसले , राजेंद्र राजापुरे मा.अध्यक्ष स्थायी समिती, कनिष्ठ अभियंता विजय कांबळे, सुहास शिंदे नगर रचना विभाग, तसेच स्थानिक नागरिक राजाबाबू सरकानिया आणि सत्यवान ग्यानी यांनी समझोता करारावर स्वाक्षरी केली.

 

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago