Google Ad
Uncategorized

अखेर रविंद्र महाजनींच्या सुनेने सोडले मौन; म्हणाली, ‘टोमण्यांच्या भट्टीत तापलेला माणूस राख नाही तर..’

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४ ऑगस्ट) : मराठी सृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून वास आल्याने ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागली.

त्यांच्या पार्थिवाला मुलगा गश्मीरने अग्नी दिला. मात्र इतके दिवस होऊनही आता प्रेक्षकांनी गश्मीरवर टीकेची झोड उठवली आहे. गश्मीरने वडील रविंद्र महाजनी यांच्याकडे लक्ष दिले नाही, त्यांची काळजी घेतली नाही, असे म्हणत अनेकजण त्याच्यावर टीका करत आहेत.

Google Ad

पण मी त्यांचा मुलगा होतो. तुमच्यापेक्षा जास्त मी त्यांना ओळखतो असे म्हणत गश्मीरने टीका करणाऱ्यांना उत्तर दिले होते. तसेच योग्य वेळ आल्यावर भविष्यात मी नक्कीच याबाबत खुलासा करेन असेही गश्मीर महाजनीने म्हटले होते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गश्मीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.

तरी गश्मीरची पत्नी गौरी ते सहन करत होती. पण आता तिने यावरचे मौन सोडले आहे. आता गौरीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये गश्मीर एका पुजेत बसलेला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

त्या फोटोच्या खाली कॅप्शन देत तिने ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. टोमण्यांच्या भट्टीमध्ये तापलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो. मला कायमच गर्व आहे की तु माझा पती आहे, असे कॅप्शन तिने दिले आहे. तिने यातून ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले होते. ते त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काही महिन्यांमध्ये एकटेच राहत होते. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!