Categories: Uncategorized

नितीन चिलवंत यांची शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सदस्यपदी नियुक्ती …एकनाथ पवार व अरुण पवार यांच्या हस्ते सत्कार

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१८ जुलै)  : मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम नियोजनासाठी गठीत झालेल्या समितीत मराठवाडा जनविकास संघाचे सदस्य नितीन चिलवंत यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पार्टीचे महापालिकेतील माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार व मराठवाडा जनविकास महाराष्ट्र राज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या हस्ते नितीन चिलवंत यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतुल लोंढे ही उपस्थित होते.

नितीन चिलवंत मराठवाडा मुक्तीसंग्राम लढयातील स्वातंत्र्यसैनिकाचे नातू आहेत. तसेच मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या कार्यात नेहमी अग्रेसर आहेत. त्यांनी दोन संकल्प केले असून, पिंपरी-चिंचवड व आळंदी येथे कार्यक्रमांचे आयोजन करून आळंदी येथील इंद्रायणी घाटावर ७५ हजार दीप व समई लावून मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव साजरा करणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडावासिय, ज्येष्ठ नागरिक, युवक युवती, स्वातंत्र्य सेनानी यांच्या हस्ते तिरंगा ध्वजवंदन करून 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हे दोन्ही संकल्प चांगले असून, याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन एकनाथ पवार व अरुण पवार यांनी दिले.

Maharashtra14 News

Recent Posts

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शाम जगताप यांच्या वतीने … पिंपळे गुरव परिसरात २० हजार नागरिकांना दिनदर्शिका वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…

17 hours ago

स्वच्छतेमुळेच पेशंट बरे होण्यास मदत होते – नवनिर्वाचित आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालयास भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…

2 days ago

वाकड-हिंजवडी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार शंकर जगताप अकॅशन मोडवर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…

1 week ago

महाराष्ट्राचा 58 व्या निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ …. पुण्याच्या धरतीवर होणार संत समागम

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 :  महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…

2 weeks ago

अखेर राज्य मंत्रिंमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते मंत्रालय

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…

2 weeks ago