महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० जुलै) : पुण्यातील प्रसिद्ध जोशी वडेवाले शैलेश जोशी यांचे बंधु ज्ञानेश्वर (माऊली) महादेव जोशी यांचे आज दि.३० जुलै रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
जीवन विद्या मिशन परिवारातील ते ज्येष्ठ मार्गदर्शक होते. त्यांना सर्वजण आदरणीय माऊली काका जोशी या नावाने ओळखत होते. त्यांचे बंधू शैलेश जोशी यांच्या वडापाव च्या व्यवसायामुळे त्यांना जोशी वडेवाले या नावानेही प्रसिद्धी मिळाली होती. त्यांच्या निधनाने सांगवी गाव तसेच परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे चार भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे.
सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव मधील त्यांच्या सर्व चाहत्यांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो , ही ईश्वर चरणी प्रार्थना!
“ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली”!!
टीप :- अंत्यविधी रविवार दि. ३० जुलै सायंकाळी सात ते आठ च्या सुमारास सांगवी स्मशानभूमी येथे होईल.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि..04 ऑगस्ट :- पिंपरी-चिंचवड शहरातील सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याची जागेवरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ ऑगस्ट २०२५ :* कधी कुणी नात्यांपासून दूर गेलेलं, तर कुणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.02ऑगस्ट) : अनेक लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 ऑगस्ट :– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक…
महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :- जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन…