Categories: Editor Choice

“ नागरवस्ती विभागाच्या मानधनावरील समुह संघटक कर्मचारी यांना मुदतवाढ द्या…. उपमहापौर हिराबाई घुले यांची प्रशासनाला सूचना”

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ ऑक्टोबर) :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर योजना राबविण्याकामी समुह संघटकांची मानधन तत्वावर  महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय व मनपा मुख्यालय येथील समुह संघटकांना मुदतवाढ देण्याची सूचना उपमहापौर हिराबाई घुले यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.

 याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे कीपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर योजना राबविण्याकामी समुह संघटकांची मानधन तत्वावर  महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय व मनपा मुख्यालय येथे नेमणूक करण्यात आलेली आहे.  तसेच महापालिका हद्दीतील महिला व बालकांचे कल्याण, दारिद्र रेषेखालील व्यक्ती, गरीब, अपंग व मागासवर्गीय व्यक्तींच्या विकासाकरिता कल्याणकारी योजनांचे महत्वपूर्ण कामकाज करीत आहेत. सद्यस्थितीमध्ये मानधनावरील कार्यरत असलेल्या समुह संघटकांची मुदत नुकतीच संपुष्टात आलेली आहे.

नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वरील विविध योजनांचा शहरातील नागरीक, विद्यार्थ्यांना विनाअडथळा लाभ मिळणेकामी मानधनावरील कार्यरत असलेल्या सर्व समुह संघटकांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी सूचना उपमहापौर घुले यांनी केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

7 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago