Categories: Editor ChoiceSports

सांगवी पीडब्लूडी मैदानात रंगला महिला डॉक्टरांचा रोमहर्षक क्रिकेट सामना …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ जानेवारी २०२२) : नुकताच २०२१ वर्ष संपन्न झाले असून २०२२ वर्षाला प्रारंभ झाला आहे. २०२०-२१ या वर्षात जगभरात कोरोनाने थैमान घातला होता. ज्यात सर्व डॉक्टरांनी आपल्या जीवाची बाजी लावून सर्वसामान्यांच्या जीवाची काळजी घेतली. आपला दररोजचा जीवनप्रवासच या कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीने खंडित करून टाकला. त्यात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची ठरली. प्रसंगी आपला आनंद बाजूला ठेऊन अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे काम त्यांनी या संकट काळात केले.

या कोरोनाच्या काळात अनेक मोठ मोठ्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. परंतु आज आमदार चषक क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून डॉक्टर, पोलिस, नगरसेवकांनी याचा आनंद घेतल्याचे आज पहायला मिळाले, निमित्त होते सांगवीत होणारे रोमहर्षक आमदार चषक क्रिकेट सामने…

२०२२ या नववर्षात क्रिकेट रसिकांसाठी मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट प्रेमी खेळाडूंना भरपूर मेजवानी आहे. या वर्षात एकूण ९२ संघात आमदार चषक क्रिकेट स्पर्धा होत आहेत. आज नवव्या दिवशी (शुक्रवार ०७ जानेवारी ) सकाळी ०८ वाजता नवी सांगवीतील PWD मैदानावर क्रिकेट समन्यांना सुरुवात झाली. आज झालेल्या सामन्यात शहरातील महिला डॉक्टर सहभागी झाल्याचे दिसून आले. कोरोनाच्या काळात त्यांना आपल्या आनंदाला हरवून गेल्या होत्या, परंतु क्रिकेटच्या मैदानावर आगमन होताच, त्यांचा उत्साह अगदी कौतुक करण्यासारखा होता.

डायनॅमिक डेंटिस्ट आणि सांगवी-पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशन यांच्यात सामना खेळला गेला. या झालेल्या चुरशीच्या रोमहर्षक सामन्यात डायनॅमिक डेंटिस्ट आणि सांगवी-पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशन यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळाली यामध्ये सांगवी-पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशन (SPDA) ने हा सामना जिंकला. तर त्याच संघाच्या डॉ. भाग्यश्री डांगे ३३ रन काढून मॅन ऑफ द मॅच चा चषक पटकावला.

चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त फुल पिच टेनिस बॉल आमदार चषक क्रिकेट स्पर्धाचे आयोजन माजी नगरसेवक ‘शंकरशेठ जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथील ‘पीडब्लूडी’ मैदान येथे करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच स्टंप मध्ये live कॅमेरा ची सोय उपलब्ध करण्यात आली आहे, हे या सामन्यांचे वैशिष्ट्य आहे. या आयोजनात अजय दुधभाते, निलेश जगताप तसेच मनीष कुलकर्णी यांचे योग्य नियोजन आणि मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे दिसून येत होते.

आमदार चषक क्रिकेट सामन्याचे लाईव्ह थेट प्रेक्षपण http://Www.criclife.in अजयदादा दुधभाते, दिपक मंडले सर,प्रदिप गुळमिरे सर्व टीम यांनी अगदी साजेसे असे केले आहे,त्यामुळे क्रिकेट प्रेमींनी घरात बसून खेळाचा आनंद घेतला.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago