पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा स्वतंत्र कक्ष स्थापन .. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याबाबत चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी या संदर्भात कक्ष अधिकारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडे उपरोक्त विषयान्वये पत्र पाठवून मागणी केली होती.

तसेच लक्ष्मण जगताप यांनी सन २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कपात सूचना क्रमांक १२०४ मांडलेली होती त्यात त्यांनी पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या व वाढता भौगोलिक विस्तार पाहता संजय गांधी निराधार योजनेचे अंध , दिव्यांग , विधवा , ज्येष्ठ नागरीक असे दहा हजाराहून अधिक लाभार्थ्यांना योजनेची कागदपत्राची पुर्तता करण्याकरिता अनुदानाचा लाभ घेण्याकरिता पुणे शहरातील कार्यालयात वारंवार जावे लागते परिणामी गरीब नागरिकांना आर्थिक भुर्दंड व मनस्ताप सोसावा लागत असल्याने लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणे कठीण व जिकरीचे होते. त्याकरीता पिंपरी चिंचवड शहरातील शासकिय कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा स्वतंत्र कक्ष स्थापन करणेबाबतचे कपात सुचनेच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत संदर्भिय पत्रान्वये कळविणेत आले होते.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना कार्यालय पिंपरी चिंचवड शहराकरिता स्वतंत्र कार्यालय निर्माण करणेसाठी व आवश्यक पदनिर्मिती प्रस्ताव तातडीने करणे याबाबत दि .७ फेब्रुवारी २०१८ रोजीचे पत्रान्वये कळविले होते . त्याअनुषंगाने कार्यालय निर्माण करणेकामी व शासनास पदनिर्मिती करणेकामी पत्र दि .१ / ८ / २०१८ नुसार विभागीय आयुक्त पुणे विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर करणेत आला .

आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या मागणीचा विचार करून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पिंपरी चिंचवड कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा स्वतंत्र कक्ष स्थापन करणेत आलेला आहे, याची माहिती दिली. या बाबत आदेश श्रीमती , विमल डोलारे नायब तहसिलदार हवेली ( संगांयो शाखा ) यांनी त्यांचेकडील असलेला पदाचा कार्यभार सांभाळून श्री . भिमाशंकर बनसोडे लिपीक ( अप्पर तहसिल कार्यालय पिंपरी चिंचवड ) यांना नेमून दिलेल्या कामकाजाचा वेळोवेळी त्यांचेकडून आढावा घेण्यात यावा .

तसेच कक्षप्रमुख म्हणून सदर कामकाजावर नियंत्रण व पर्यवेक्षण करणे . तसेच श्री . भिमाशंकर बनसोडे लिपीक ( अप्पर तहसिल कार्यालय पिंपरी चिंचवड ) यांनी आपलेकडील असलेला पदाचा कार्यभार सांभाळून पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अर्जदारांचे योजनानिहाय अर्ज स्विकारणे , अर्जाची प्राथमिक छाननी करणे , आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी अर्जदारांना कळविणे , व छाननी अंती पात्र असलेले अर्ज तहसिलदार हवेली ( संजय गांधी योजना शाखा ) यांना पुढील कार्यवाहीसाठी सादर करणे व तदअनुषंगिक इतर कामकाज करणे, आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करणेत यावी असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कळविले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 weeks ago