Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात सर्व प्रभागांत आठ ठिकाणी महिलांसाठी घेतलेल्या ‘स्वच्छतेची पैठणी’ या कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २८ ऑक्टोबर २०२२ :- शहरात घनकचरा विलगीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘हरा गिला, सुखा नीला’ या मोहिमेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात सर्व प्रभागांत आठ ठिकाणी महिलांसाठी घेतलेल्या ‘स्वच्छतेची पैठणी’ या कार्यक्रमास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या माध्यमातून कचरा विलगीकरणाचे महत्त्व या विषयावरील प्रश्नमंजुषा तसेच  प्रबोधनाद्वारे जनजागृती करण्यात आली.

          भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महराष्ट्र राज्याच्या नागरी प्रकल्प अंमलबजावणी कक्षाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘हरा गिला, सुखा नीला’ या मोहिमेचा क्षेत्रीय स्तरावर प्रचार व प्रसार करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरात सर्व प्रभागांत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील आठ ठिकाणी कचरा विलगीकरणावर आधारित स्वच्छतेची पैठणी हा अनोखा  कार्यक्रम अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त अजय चारठाणकर आणि आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांच्या नियंत्रणाखाली घेण्यात आला. यावेळी विजेत्या आठही प्रभागातील  महिलांना प्रथम क्रमांकासाठी पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी सोन्याची नथ तर तृतीय क्रमांकासाठी चांदीचा छल्ला देण्यात आला.

         अ प्रभागातील विठ्ठल मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये माधुरी कुपटे यांनी प्रथम क्रमांकाची पैठणी जिंकली. जान्हवी पाटील यांनी द्वितीय तर शोभा राखपसरे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. ब प्रभागात चिंचवड येथील राजमाता जिजाऊ पर्यटन केंद्र येथील कार्यक्रमात ज्योती तळेकर यांनी पैठणीचे बक्षीस जिंकले, पूनम लोहार  यांनी द्वितीय क्रमांक तर पूजा साळवे यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले.

 क प्रभागातील गवळीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात मनीषा शेळके यांनी पैठणी, सोनल काळे यांनी द्वितीय तर शिवगंगा पवार यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले.ड प्रभागातील डायनासोर उद्यान येथील कार्यक्रमामध्ये अनुजा कांबळे यांना प्रथम क्रमांकाची पैठणी तर अन्य दोन महिलांना द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे मिळाली.

इ प्रभागातील मोशी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेत कविता वैरागल यांनी प्रथम क्रमांकाची पैठणी तर संगीता सुगर यांनी द्वितीय, कविता नाईकनवरे यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले,फ प्रभागातील कार्यक्रमात पूनम खंडागळे यांनी प्रथम क्रमांकाची पैठणी, सरीन शेख यांनी द्वितीय तर सुजाता मकड यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले.

ग प्रभागातील बापुजी बुवा उद्यानात झालेल्या कार्यक्रमात सोनी शिंदे यांनी प्रथम क्रमांकाची पैठणी तर छबूबाई बरिगल यांनी द्वितीय, वनिता लिंबोळी यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षिस मिळवले. ह प्रभागातील आई उद्यान.दापोडी येथे झालेल्या कार्यक्रमात अश्विनी शिंदे यांनी प्रथम क्रमांकाची पैठणी तर वैशाली लगाडे यांनी द्वितीय, नलिनी अहिरे यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले.

कार्यक्रमात नागरिक तसेच संबधित क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, सहा आरोग्य निरीक्षकांनी उपस्थितांना स्वच्छतेचे तसेच कचरा विलगीकरणाचे महत्त्व सांगितले.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

3 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

13 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

13 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago