Categories: Uncategorized

नवी सांगवी पिंपळे गुरव मध्ये चौकाचौकात, रस्त्यांवर आणि पदपथांवर अतिक्रमण वाढले … रस्ते फुटपाथ कशासाठी ? नागरिकांचा मनपाला संतप्त सवाल !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ मार्च) : नवी सांगवी – पिंपळे गुरव येथे पदपथांवर अतिक्रमने वाढल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत आहे. महापालिकेच्या वतीने तात्पुरती कारवाई केले जात असल्याने पुन्हा ही अतिक्रमणे ‘जैसे थे’ होत आहे. त्यातच रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत.

परिसरातील पदपथांवर सायंकाळच्या वेळी भाजीविक्रेते बसत आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यावर टेम्पो लावून भाजी विक्री करण्यात येत आहे. यात एम एस काटे चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौक, फेमस चौका चा समावेश आहे. तसेच दुकानदारांकडून ठिकठिकाणी पदपथांवर कायमस्वरूपी अतिक्रमणे करण्यात आली आहेत.

नवी सांगवीतील साई चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस ठाण्यासमोर अनेक वाहने रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत अनेक दिवस धूळखात पडून आहेत. तसेच मुख्य चौकापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांवर अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विक्रेत्यांमध्ये अनेक वेळा वाद होताना आढळतात. महानगरपालिकेकडे अनेक नागरिक याची तक्रार करत आहेत, परंतु तात्पुरती मलमपट्टी करण्याखेरीज महानगरपालिकेकडे कायमस्वरूपी कोणत्याही प्रकारची उपाययोजना नसल्याचे वारंवार होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी वरून दिसून येते. त्यामुळे मनपाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.

वारंवार तक्रार करूनही मनपाचे अधिकारी जुजबी कारवाई करतात, नवी सांगवी आणि पिंपळे गुरव भागात तात्पुरती भाजी मंडई उभारण्यात आली असून तरीही विक्रते रस्त्यावर आणि फुटपाथवर आपला व्यवसाय करत असल्याने नागरिकांना वाहन चालवणे आणि फुटपाथ चा वापर करता येत नसल्याच्या तक्रारी जेष्ठ नागरिक आणि महिला करत आहेत. त्यामुळे महानगरपालिका अतिक्रमण विभागाने याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

सुरेश सकट (सामाजिक कार्यकर्ते)

Maharashtra14 News

Recent Posts

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात काय दिले : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प२०२५ चे ठळक मुद्दे

*महाराष्ट्राच्या #अर्थसंकल्प२०२५ चे ठळक मुद्दे:* *विकसित भारत-विकसित महाराष्ट्र.* महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१० मार्च : महाराष्ट्र…

2 days ago

सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट मंडळाच्या वतीने 8 मार्च 2025 जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

महाराष्ट्र 4 न्यूज, दि.०८ मार्च : कोणत्याही स्त्रीला तिच स्वातंत्र्य देण, समान वागणुक देण, तिच्या…

3 days ago

वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या कीर्तनाने रचला सोहळ्याचा पाया जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर महोत्सव

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ मार्च :  जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त…

3 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण... : चिंचवड येथील…

4 days ago