अकरावी प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेला सुरूवात, पुण्यात कुठे आहेत मदत केंद्र, किती आहे कटऑफ? पाहा एका क्लिकवर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ऑगस्ट) : उच्च न्यायालयाने अकरावीच्या प्रवेशासाठीची (11th Admission) सीईटी (CET) रद्द केल्यानंतर आजपासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया (11th Admission Process) सुरू करण्यात आली आहे. पुणे (Pune), पिंपरी चिंचवडसह (Pimpri Chinchwad) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), रायगड (Raigad) या भागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. १४ ते २२ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, विद्यार्थ्यांचे अर्ज, अर्जांची छाननी, दुरुस्तीची प्रक्रिया पार पडणार आहे. प्रवेश प्रक्रियेची सगळी माहिती http://11thadmission.org.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

२२ ऑगस्टपर्यंत चालणार पहिला राउंड

महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना आणि सर्वांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे बंधनकारक आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुरुवात झाली. विद्यार्थी स्वतःचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. नियमित प्रवेशाचा पहिला राउंड २२ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.

मदतीसाठी मार्गदर्शन केंद्रांची स्थापना

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी आणि पालकांना काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन केंद्रेही तयार करण्यात आली आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरासाठी ५३ मार्गदर्शन केंद्र तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांवर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेशी संबंधित अडचणी सोडवण्यास मदत केली जाणार आहे.
या सेंटर्सशी संपर्क साधल्यानंतर तिथले प्रतिनिधी तुम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करतील.  https://pune.11thadmission.org.in/ या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुण्यातल्या सर्व ५३ मार्गदर्शन केंद्रांची माहिती उपलब्ध होईल. तुमच्या झोननुसार तुम्ही या केंद्रांवर जाऊन ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आपल्या अडचणी सोडवता येतील.

पुण्यात किती आहे ११ वीसाठीचा कट ऑफ?

यंदा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीवर १० वीचे गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा भरभरून गुण मिळाले आहेत. त्यामुळे ११ वी प्रवेशासाठी चांगलीच चुसर आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी आवश्यक असणारे पात्रता गुण म्हणजेच कट ऑफ (Cut Off for 11th admission) यावर्षी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी तिन्ही राउंडसाठीच्या कटऑफ बद्दलची माहिती ११ वी प्रवेशाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

13 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

14 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 day ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago