श्री गणेश सहकारी बँक ही लोकसेवेचा वसा घेतलेली बँक असून, बँकेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांना याचा मोठा फायदा झाला आहे. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप हे बँकेचे संस्थापक – संचालक होते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाने या बँकेच्या माध्यमातून अनेकांचे व्यवसाय उभे राहिले आहेत.आगामी काळात सहकार क्षेत्र हे देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळेच लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप, नानासाहेब शितोळे, दत्तात्रय उर्फ रावसाहेब चौगुले, राजेंद्र राजापूरे आणि उद्धव पटेल यांच्या पुढाकाराने सन १९९८ साली बँकेची स्थापना केली. लोकनेते लक्ष्मणभाऊ यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे तसेच बँकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या तत्पर सेवा, आकर्षक कर्ज योजना, ठेव योजना यामुळे बँकेकडे ग्राहकांचा ओघ सातत्याने वाढत आहे.
श्री गणेश सहकारी बँक मर्यादित या बँकेची पंचवार्षिक निवडणुकीत सर्व १७ उमेदवार बिनविरोध निवडून (सन २०२३-२०२८) आले. या निवडलेल्या संचालक मंडळातून बँकेच्या अध्यक्ष व इतर पदाधिकारी निवडले जाणार होते यात सर्वानाच उत्सुकता होती. ती शंकर जगताप यांची निवडीचे पूर्ण झाली, शंकर जगताप यांनी लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या पावलावर पाऊल टाकत बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा कायम ठेवण्यात यश मिळवले होते, या बद्दल खातेदार, सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे…
अध्यक्ष : शंकर पांडुरंग जगताप
उपाध्यक्ष : संतोष सखाराम देवकर
संचालक सदस्य –
संजय गणपत जगताप
सुरेश शंकर तावरे
दत्तात्रय गोविंद चौगुले
शशिकांत गणपत कदम
राजेंद्र शंकर राजापुरे
उद्धव मुरार पटेल
अंकुश रामचंद्र जवळकर, शिवलिंग बसवंतप्पा किंणगे
मधुकर सोपान रणपिसे
सुरेश तात्याबा शिंदे
शहाजी भगवानराव पाटील
अभय केशव नरडवेकर
प्रमोद नाना ठाकर
सौ. राजश्री बिभीषण जाधव
सौ. शैला जनार्दन जगताप
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या माध्यमातून श्री गणेश सहकारी बँक आजही आपली नियमित प्रगती करत आहे. यामुळे बँकेवर तिच्या ग्राहकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यावर व बँकेवर ज्या पद्धतीने सभासदांनी व खातेदारांनी विश्वास ठेवला, तोच विश्वास आणि बँकेची नियमित प्रगती साधण्यासाठी आम्ही सर्व नवनिर्वाचित संचालक कटिबद्ध आहोत.
शंकर पांडुरंग जगताप, नवनिर्वाचित अध्यक्ष श्री गणेश सहकारी बँक मर्या., पिंपळे गुरव.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…