Jalgaon : एकनाथ खडसे दोन दिवसांत करणार मोठा खुलासा, कुणाची नावं येणार समोर?

महाराष्ट्र 14 न्यूज : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते आणि माजी एकनाथ खडसे लवकरच कागदपत्रांसह मोठा खुलासा करण्याच्या तयारीत आहे. ‘आपल्याकडे योग्य कागदपत्र आणि पुरावे असून दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार’, असं एकनाथ खडसे यांनी जाहीर केले आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्थेत गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणाशी संबंधीत काही महत्त्वाची कागदपत्र, पत्रव्यवहार आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला असल्याचे वृत दैनिक लोकमतने दिले आहे. या प्रकरणामध्ये बँकेची मालमत्ता ही कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आली आहे, यामध्ये जिल्ह्यातील दिग्गज नेते, आमदार, खासदार आणि माजी मंत्र्याचा सुद्धा समावेश आहे’, असंही खडसे यांनी सांगितले आहे.

बीएआर संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी 2018 पासून अनेक वेळा तक्रारी केल्या आहे. या सोबतच खासदार रक्षा खडसे यांच्या लेटरहेडवर देखील दिल्ली इथं अॅड. कीर्ती पाटील यांनी देखील तक्रार केली आहे, असंही खडसे यांनी सांगितले.
राज्य सरकारकडे तक्रार केल्यानंतर सुद्धा सरकारने या प्रकरणाची कारवाईही थांबवली होती, असं सांगत खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले आहे. पण, बीएआर संस्था ही मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा 2002 प्रमाणे संस्थेवर कारवाई करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे, त्यामुळे राज्याचे सहकार आयुक्त कारवाई करू शकत नव्हते, त्यामुळे राज्याने आपला अहवाल पाठवून कारवाई थांबवली होती, असंही खडसे यांचं म्हणणे आहे.

या प्रकरणामध्ये जळगाव जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी मंत्र्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. अशात जर काही माहिती दिली तर चौकशीमध्ये हस्तक्षेप केल्यासारखे होईल. त्यामुळे आताच नावे जाहीर करणे हे योग्य ठरणार नाही म्हणून एकदा का चौकशी पूर्ण झाली की दोन दिवसांत संपूर्ण माहितीसह पत्रकार परिषद घेणार आहे’, असंही खडसे यांनी सांगितले. ‘बीएआर संस्थेतील घोटाळा हा हजारो कोटी किंमतीचा असल्याचे बोलले जात आहे. आर्थिक शाखेनं कारवाई सुरू केल्यापासून अनेक राजकीय नेत्यांची नावं समोर येईल असे तर्कवितर्क लावले जात आहे, त्यातच आता एकनाथ खडसे पुराव्यानिशी नाव जाहीर करणार असल्याची घोषणा केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. खडसे नेमकं कोणत्या नेत्यांची नावं जाहीर करतात, हे पाहण्याचे ठरणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago