Categories: Editor Choice

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरचे पदवी शिक्षण घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शैक्षणिक अर्थसहाय्य … आता या शिक्षण शाखांचाही समावेश

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.९ जून २०२२:- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरचे पदवी शिक्षण घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेत आता “बॅचलर ऑफ आर्किटेक्ट” (B Arch), “बॅचलर ऑफ फिजिओथेरपी”(BPTH), “बॅचलर ऑफ फार्मसी”(B Pharm), “बॅचलर ऑफ वेटेरीनरी सायन्स”(BVSC) या शिक्षण शाखांचाही समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.

महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत शहरातील महिला, विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, मागासवर्गीय अशा विविध घटकांसाठी अनेक कल्याणकरी योजना राबविल्या जातात. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत १२ वी नंतरच्या एमबीबीएस (MBBS), बीएएमएस (BAMS), बीएचएमएस (BHMS), बीडीएस (BDS), बीयुएमएस (BUMS), एमबीए (MBA) इत्यादी पदवी अभ्याक्रमासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. आता या योजनेत सुधारणा करण्यात आली असून या योजनेतील शैक्षणिक शाखांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सुधारित योजनेमध्ये आर्किटेक्ट”(B Arch), “बॅचलर ऑफ फिजिओथेरपी”(BPTH), “बॅचलर ऑफ फार्मसी”(B Pharm), “बॅचलर ऑफ वेटेरीनरी सायन्स”(BVSC) या शिक्षण शाखांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच सुधारित योजनेत ‘एमबीए’( MBA) या शिक्षण शाखेला वगळण्यात आले असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाकरिता, एकदाच, २५ हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत अटी शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. यासाठी पात्र विद्यार्थी हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने अर्जासोबत त्याच्या आधार कार्डची प्रत, महापालिका हद्दीतील स्वत:चे अथवा वडिलांच्या किंवा पालकांच्या मतदार कार्डाची प्रत किंवा मतदार यादीची प्रत जोडावी, विद्यार्थी किंवा त्याच्या वडिलांचा सक्षम प्राधिकारी यांच्याकडील जातीचा दाखला किंवा विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत सोबत जोडावी, तसेच शासनाने विहीत केलेल्या पद्धतीने गुणवत्तेनुसार फ्रीसीट किंवा मेरीटशीट नुसार मिळवलेल्या प्रवेशपत्राची प्रत, महाविद्यालयाचा प्रथम वर्षात शिकत असल्याचा दाखला – बोनाफाईड, १२ वी उत्तीर्ण अथवा पदविका उत्तीर्ण (केवळ अभियांत्रिकी पदवीसाठी) असल्याबाबतची गुणपत्रिकेची प्रत जोडणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदाराने अर्जासोबत शैक्षणिक अहर्ता व अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासंबंधीत कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ ई.सी.एस. द्वारे देण्यात येणार असल्याने, अर्जदाराने स्वत:च्या अथवा पालकांच्या नावे असलेल्या बँक खात्याचा खातेक्रमांक, आय.एफ.सी.कोड, एम.आय.सी.आर.कोड इत्यादींसह अद्यावत असलेल्या पासबुकची प्रत जोडणे बंधनकारक आहे.

शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य योजनेचा शहरातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

10 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

10 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

21 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

21 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago